Ads

Ads Area

अंबप येथील ग्रामसभेत घेतला दारूबंदी, डीजे, गुटखा बंदचा निर्णय

 अंबप येथील ग्रामसभेत घेतला दारूबंदी, डीजे, गुटखा बंदचा निर्णय

हातकणंगले (कटूसत्य वृत्त):- अंबप (ता. हातकणंगले) येथील ग्रामसभेत गावात दारूबंदी, डीजे, लेझर शो, मटका व गुटखा विक्रीवर बंदी घालत डिजिटल फलकावर सुध्दा मर्यादा घालण्याचा निर्णय महिला व पुरुषांचा ग्रामसभेत सर्वांनुमते घेण्यात आला.

      सकाळी महिला ग्रामसभेचे आयोजन केले होते. सभेच्या अध्यक्षपदी सरपंच दीप्ती माने होत्या.  नंतर सर्व समावेशक ग्रामसभा घेतली. ग्रामविकास अधिकारी डी.व्ही. शिंदे यांनी सभेला सुरुवात केली. यावेळी महिलांनी पुढाकार घेत दारूच्या व्यसनाने होणारे दुष्परिणाम व्यक्त केले. गावात पूर्ण दारूबंदी करण्याचा ठराव मांडला. याला उपस्थितांनी  हात उंचावून संमती दिली.यावेळी पेठ वडगावचे साहयक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांनी अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. डीजेच्या कर्कश आवाजाने लहान मुले व ज्येष्ठांना होणाऱ्या त्रासामुळे कोणत्याही कार्यक्रमातून डीजे बंद करण्याचा ठराव पास करण्यात आला. लेझर शो, गावात गुटखा विक्री, मटका बंदीचे ठराव सर्वांनुमते पास करण्यात आले. नागनाथ मंदिराचे पालखी गावातील मुख्य चौकातून नेण्याचा ठराव करण्यात आला. प्लास्टिक कचरा, आरोग्य, स्मशान भूमी यावर ऐनवेळेच्या विषयात चर्चा करण्यात आली.

      यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनीषा माने(वहिनी) उपसरपंच अविनाश अंबपकर, तलाठी एकनाथ पाटील, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड, माजी उपसरपंच राजेंद्र माने डी के माने बापू सामाजिक कार्यकर्ते तानाजी ढाले तंटामुक्त अध्यक्ष संतोष उंडे सुधीर माने, किरण कानडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close