Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ नागरिक महासंघाचे शनिवारी महाअधिवेशन

 ज्येष्ठ नागरिक महासंघाचे शनिवारी महाअधिवेशन 




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ पुणे विभाग सोलापूर या संस्थेचे अधिवेशन कार्यक्रम येत्या शनिवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 10:30 वाजता लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे होणार असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक संघाचे सोलापूर अध्यक्ष घनश्याम दायमा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


       पुणे, सातारा, सोलापूर येथील 700वर प्रतिनिधी या अधिवेशनासाठी येतील. जेष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर या अधिवेशनात ठराव होणार आहे. श्रीकांत मोरे, जयेशभाई पटेल, चंद्रकांत तापडिया, बाबुभाई मेहता, ए. डी. जोशी, नीलकंठप्पा कोनापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अधिवेशन होत आहे. यात ज्येष्ठ नागरिक संघाचे समन्वयक गुरुलिंग कन्नूरकर तसेच अरुण रोडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विविध अकरा पुरस्कार यावेळी देण्यात येतील. तसेच 'वार्धक्य जीवन डिजिटल तंत्रज्ञान सांगड कशासाठी' या विषयावर अविनाश लकारे यांचे व्याख्यान होणार असल्याचे दायमा यांनी सांगितले. 


     या पत्रकार परिषदेस गुरुलिंग कन्नूरकर, विजय कुलकर्णी, मन्मथ कोल्हापुरे, संजय जोगीपेठकर, नागनाथ पाटील आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments