भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांचा शहीद दिवस 21 मे रोजी सद्भावना दिनानिमित्त निर्धार महामेळावा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यानी काँग्रेस भवन येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्धार महामेळावा विषयी माहिती देताना सांगितले की, केंद्र राज्य स्थानिक स्वराज्य मध्ये काँग्रेस विचारांचे सरकार हाच निर्धार
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कर्तबगार अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली तसेच विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेसचे आमदार पदाधिकारी सर्व ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीत दिनांक 21 मे 2023 रविवार रोजी सकाळी 11:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोलापूर येथे निर्धार महामेळावा आयोजित केला आहे
या समावेत सोलापूरच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या आमदार फंडातून उभारलेल्या 1) एमपीएससी यूपीएससी कोचिंग ट्रेनिंग सेंटर (पोलीस मुख्यालय समोर ) या भव्य वास्तूचे उद्घाटन व लोकार्पण सकाळी 11 वाजता होणार आहे तसेच 2) शुभराय आर्ट्स गॅलरीचे नवनिर्माण अंतर्गत नाविन्यपूर्ण मराठी भवन (हुतात्मा स्मृती मंदिर लगत ) वास्तूचे भूमिपूजन समारंभ सकाळी 11:15 वाजता मान्य प्रांताध्यक्ष नाना पटोले व सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे.
सोलापूर शहर जिल्ह्यातील आगामी काळात लोकसभा विधानसभा महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांची सक्षम तयारी करण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याकरिता समक्ष संवाद साधून मार्गदर्शन करून गाव पातळीतून ते देशपातळीपर्यंत काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विज्ञानवादी विचारांचे समृद्धी सुरक्षितता बंधुभाव शांती संमतेचे लोक कल्याणकारी धोरण व योजनांद्वारे लोकांच्या जीवनात अमलाग्र बदल घडविणारे सरकार स्थापित करण्याचा निर्धार करण्यात येणार आहे
संपूर्ण भारत देशात आज रोजी धर्म जात पंतांच्या नावावर सामाजिक ध्रुवीकरण करून समाज असुरक्षित व भयभीत करून आपला जातीवादी अझेंडा रेटण्याचे काम सत्ताधारी भाजपने चालवले आहे देशातील संवैधानिक संस्थेचे अस्तित्व धोक्यात येत आहे सत्तेच्या पाशवी बळाचा गैरवापर करीत लोकनियुक्त सरकारे पाडली जात आहेत सुडाचा राजकारण करीत राहुल गांधी सारख्या विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची खासदारकीही रद्द केली जात आहे ईडी, सीबीआय, आयटी, जीएसटी यांचा अवैध वापर करून खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले जात आहे लव्ह जिहाद, हिजाब, दलाल, भोंगा, मंदिर प्रवेश या संवेदनशील मुद्द्यावरून धार्मिक जातीय तेढ भाजपा सरकार निर्माण करत आहे
सर्वसामान्य जनता गोरगरीब, कष्टकरी नागरिक प्रचंड महागाई मुळे बेजार झाले तरुण बेकारीने त्रस्त व्यसनाधीन होत आहेत. भ्रष्टाचार, कमिशन खोर, हिंसाचार, दंगली, जातीय अत्याचार यामुळे अराजकता निर्माण होत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही अतिवृष्टी गारपीट नापिक यामुळे शेतकरी कंगाल कर्जबाजारी झाला आहे एसबीआय, एलआयसी सारख्या सामान्यांचा पैसा गुंतवलेल्या संस्था मोडण्याचे काम हे भाजप सरकार आपल्या उद्योगपती मित्रांना मदत करण्यासाठी करत आहे असलेलं आर्थिक कृषी उद्योग परराष्ट्र धोरण देशाला कंगाल करत आहे.
महागाई बेरोजगारी सोबत नोटबंदी, जीएसटी लॉकडाऊन यामुळे देशातील सामान्य माणूस उध्वस्त झाला आहे भाजपा सरकारच्या हुकूमशाही कारभाराने देशातील संविधान व संघटना धोक्यात आली आहे.
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भाजपचे लोक विरोधी सरकार घालून समस्त जनतेला वाचवण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्धार या महामेळाव्यात करण्यात येणार आहे या मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले आहे
यावेळी अध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, विनोद भोसले, तौफिक हत्तुरे, नरसिंग कोळी, प्रवीण निकाळजे, प्रदेश पदाधिकारी किसन मेकाले गुरुजी, मनीष गडदे, प्रा. नरसिंह आसादे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, जिल्हा काँग्रेस कमिटी वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, शहर काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी युवक अध्यक्ष अंबादास (बाबा) करगुळे, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपतीनाथ माशाळ, सांस्कृतिक सेल अध्यक्ष श्रद्धाताई हुल्लेनवरू, परिवहन सेल अध्यक्ष वशिष्ठ सोनकांबळे, आयटी सेल अध्यक्ष कुणाल घोडके, सुशिक्षित बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, बसवराज म्हेत्रे, शहर मध्य विधानसभा युवक अध्यक्ष वाहिद बिजापूरे, शहर दक्षिण विधानसभा युवक अध्यक्ष महेश जोकारे, शहर उत्तर विधानसभा युवक अध्यक्ष महेश लोंढे, प्रवक्ते नागनाथ कदम, माजी परिवहन सदस्य गणेश साळुंखे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments