Ads

Ads Area

बढती व वेतनाकारीता गुरुसेवा शिक्षक परिवाराचे बेमुदत चक्री उपोषण सुरू

 बढती व वेतनाकारीता गुरुसेवा शिक्षक परिवाराचे बेमुदत चक्री उपोषण सुरू

मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण चालु राहील उपोषणायचा पहिला दिवस

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्या गुरूसेवा परिवाराच्या केंद्र प्रमुख वतीने जिहयातील प्रा. शिक्षकांचे मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी व पदोन्नत्या कराव्यात व पगार दरमहा तारखेला खात्यावर जमा करावा या करिता चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज उपोषणाचा पहिला दिवस होता.

या जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत मे अखेट 6 शिक्षण विस्तार अधिकारी, १९९ पैकी १७८ केंद्रप्रमुख व 150 मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. ही पदे पदोन्नतीने भरण्याविषयीचे यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊन उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (प्राथ) यांनी दि. 4 / 04 / 2023 पासूनचे नियोजित चक्री उपोषण मागे घेण्याविषयीचे पत्र देऊन दि. 20/4/2023 पर्यंत मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या पदोन्नत्या पूर्ण करणार असल्याचे सांगितले होते. परंतु आज अखेर ही प्रक्रिया पूर्ण होतांना नाही. एकंदरीत प्रशासनाची पदोन्नत्या करण्याची मानसिकता नसून फक्त चालढकल करीत असल्याचे दिसून येत आहे. मागील दीड दोन वर्षांपासून दर महा 10, 15 किंवा 25 तारखेनंतरच शिक्षकांचा पगार होतो. यामुळे शिक्षकांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या टकमा वेळेश्वर फेडता येत नसल्यामुळे त्यांना व्याज व दंड भरावे लागत आहे याशिवाय त्यांचे क्रेडिट स्कोट खराब होत असल्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळवण्यात अडचणी येत आहेत. म्हणून याकडे लक्ष वेधण्याकरिताही गुरुसेवेच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे.

या गुरूसेवा परिवादात सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट), सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव थोटात गट ), सोलापूर जिल्हा आदर्श शिक्षक समिती, सोलापूर जिल्हा पदवीधर शिक्षक संघटना, सोलापूर जिल्हा प्राथमिक एकल शिक्षक सेवा मंच, सोलापूर जिल्हा उर्दू शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, प्राथ.शिक्षक पती -पत्नी सेवा संघ, जूनी पेन्शन हक्क शिक्षक संघ आदी शिक्षक संघटनांचा समावेश आहेत.

यावेळी शिक्षक नेते अंकुश काळे, म.ज.मोरे, बब्रुवान काशिद, वीरभद्र यादवाड, सुर्यकांत हलूटे (डोगे), राजाभाऊ टाऊत, सूर्यकांत व्हनमाने, रामचंद्र बिराजदार, दत्तात्रय येडवे, इक्बाल नदाफ, विजय वाघमारे, जुल्फीकार मुजावर, महसूद सिद्धिकी, पिटसाब चौधरी, हरिष कडू, अविनाश आगम, विजय लोंढे, पंडीत ढेपे, नवनाथ धांडोरे व बाबासाहेब दराडे, संभाजी फुले, सिद्राम कटगेटी, शिवाजी पाटील, पंडित साबा, आमसिध्द बिराजदार, श्रीकांत बिराजदार, मधुकर राठोड, महादेव कांबळे, विठ्ठलसिंह राजपूत, रामचंद्र कचरे, उमेश घागरे, भीमाशंकर नजरे, मंजुनाथ भतगुणकी, माल्लिनाथ पुजारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close