शिरनांदगीचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रे यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन...!
शिरनांदगी (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेची जयत तयारी पूर्ण झाली असून यंदा यात्रेचे अवचित्य साधून विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रेचे संयोजक तथा भैरवनाथ वाचनालयाचे अध्यक्ष विठोबा कुंडलिक थोरबोले पाटील यांनी दिली.
" रक्तदान श्रेष्ठ दान, रक्तदान कार्य महान" ही विचारधारा घेऊन यंदा प्रथमच गावामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 6 एप्रिल 2023 रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर भैरवनाथ वाचनालय येथे होणार असून या रक्तदान शिबिराचे उद्घाटक आणि अध्यक्ष म्हणून मारोळी मठ मठाधिपती संदेश भोसले महाराज आणि धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे सर यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन समारंभ होत असून या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मायाक्का गुलाब थोरबोले पाटील आणि दामाजी शुगर च्या संचालिका लता सुरेश कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
त्याच दिवशी रात्री आठ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
या रेकॉर्डं डान्स स्पर्धेचे उद्घाटन भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल दादा सावंत करणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार समाधान दादा अवताडे भूषविणार आहेत.
या कार्यक्रमासाठी दामाजी शुगरचे संचालक बसवराज पाटील, पंचायत समिती सदस्य नितीन पाटील, पंचायत समिती सदस्य प्रदीप खांडेकर, चेतना पतसंस्थेचे वसंत गरंडे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन तथा युवा नेते मनोज खांडेकर, सोने चांदीचे व्यापारी कालिदास महामुनी, नितीन मेटकरी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक तथा व्यवस्थापक विठोबा कुंडलिक थोरबोले पाटील यांनी शेवटी बोलताना दिली.
0 Comments