Hot Posts

6/recent/ticker-posts

"आमचे ध्येय शून्य अपघात” प्रिसिजन मध्ये सुरक्षा सप्ताहानिमित्त सुरक्षा शपथ

"आमचे ध्येय शून्य अपघात” प्रिसिजन मध्ये सुरक्षा सप्ताहानिमित्त सुरक्षा शपथ

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड कंपनी मध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला त्यावेळी कंपनीमधील सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा शपथ घेतली. प्रिसिजन उद्योग समूहात कर्मचारी हा केंद्रबिंदू मानून काम केले जाते.उद्योगामध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची सर्वाधिक काळजी घेतली जाते. प्रत्येक कर्मचाऱ्याला सुरक्षा विषयात प्रशिक्षण दिले जाते.
रस्ता सुरक्षा, काम करत असताना वैयक्तिक घ्यायची काळजी, स्वतः नियमांचे पालन केले तरच शून्य अपघाताचे ध्येय गाठता येईल यातूनच कंपनीमधील वातावरण अधिक सुरक्षित राहील. आरोग्य, पर्यावरण तसेच वैयक्तिक सुरक्षा साधने यांच्या वापराचे महत्व याची माहिती कर्मचाऱ्यांना कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक सुहास पाटील यांनी दिली. सुरक्षा विषयक माहिती व सुरक्षा साप्ताहबद्दल अमित पाटील यांनी कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर एचआर विभागाचे सरव्यवस्थापक राजकुमार काशीद यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनीही सुरक्षा विषयात आपले मनोगत व्यक्त केले. 
"आमचे ध्येय,शून्य अपघात” हि यावर्षीची सुरक्षा सप्ताहाची थीम आहे. या थीमला अनुसरून संपूर्ण सप्ताहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, सुरक्षा घोषवाक्य स्पर्धा,सुरक्षा पोस्टर स्पर्धा, सुरक्षा कविता व प्रश्नमंजुषा अशा स्पर्धांचे आयोजन कर्नाय्त आले होते. सोबतच संपूर्ण सुरक्षा सप्ताहात प्रत्येक विभागात सुरक्षा साधनांचे प्रदर्शन ही ठेवण्यात आले होते, तसेच कपंनीतील सर्व वाहनचालकांना रोड सेफ्टी, वाहतुकीदरम्यान घ्यायची काळजी, वाहतुकीचे नियम या विषयात मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास कंपनीतील सर्व अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी सुरक्षा रक्षक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments