Ads

Ads Area

दक्षिण विधानसभा मतदार संघातील रस्ते, पुलासाठी अर्थसंकल्पात 75 कोटींचा निधी - आमदार सुभाष देशमुख यांची माहिती

दक्षिण विधानसभा मतदार संघातील रस्तेपुलासाठी अर्थसंकल्पात 75 कोटींचा निधी - आमदार  सुभाष देशमुख यांची माहिती

          सोलापूर (कटूसत्य)दक्षिण तालुका  विधानसभा क्षेत्रासाठीच्या 22 अत्यावश्यक रस्त्यांच्या सुधारणा आणि 4 पुलांच्या बांधणीसाठी अर्थसंकल्पात 75 कोटी निधी तरतूद झाल्याची माहिती  आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

          दक्षिण विधानसभा क्षेत्रातील रस्ते खराब झाले होते. याबाबत नागरिकांनी आ. देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. आ. देशमुख यांनी  यावेळच्या अर्थसंकल्पात अनेक रस्त्याच्या सुधारणेची कामे मार्गी लावण्यासाठी  पाठपुरावा करून एकूण ग्रामीण भागातील महत्वाच्या 22 रस्त्यांसाठी आणि 4 पूल बांधणीसाठी  निधीची तरतूद करत 75 कोटी एवढा मोठा निधी मिळवला आहे. हा निधी दिल्याबद्दल आ. देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

          मंजूर कामे रक्कम रुपये पुढीलप्रमाणेः राजूर येथे सिना नदीवर पूल बांधणे 9 कोटीमाळकवठे - लवंगी व तेलगाव- कुसुर रस्ता सुधारणा करणे 7 कोटीमंद्रूप-कुरघोेट सुधारणा रस्ता सुधारणा करणे 7 कोटीसादेपूर-निंबर्गी रस्ता सुधारणा करणे 5 कोटी,  गावडेवाडी-वांगी रस्ता सुधारणा करणे 5 कोटीऔराद- बरूर रस्ता सुधारणा करणे 3 कोटी,  माळकवठे- औज मंद्रूप रस्ता सुधारणा करणे 3 कोटीसोलापूर- होटगी-इंगळगी रस्ता सुधारणा करणे 3 कोटीकुरघोट गावाजवळ भूसंपादनासह पुलाचे बांधकाम करणे 3 कोटीटाकळी कुरकोट माळकवठा रस्ता सुधारणा करणे 2.5 कोटी,सिंदखेड-हत्तूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम 2.5 कोटीमद्रे-सिंदखेड रस्त्यावरील पुलाचे बांधकाम 2.5 कोटीविंचूर-भंडारकवठे रस्ता सुधारणा करणे 2.5 कोटी,  शिवणी-हिरज रस्ता सुधारणा करणे 2 कोटीअकोले मंद्रूप-कंदलगाव रस्ता सुधारणा करणे 2 कोटी,  तिर्‍हे कवठे रस्ता सुधारणा करणे 2 कोटीतिलाटी गेट- इंगळगी-शिरवळ रस्ता सुधारणा करणे  2 कोटीबोळकवठे-नांदणी रस्ता सुधारणा करणे 1.5 कोटीमद्रे-कुमठे रस्ता सुधारणा करणे 1.5 कोटीवांगी-वडकबाळ रस्ता सुधारणा करणे 1.5 कोटीअंत्रोळी ते गुंजगाव रस्ता सुधारणा करणे 1.5 कोटीनंदूर-शमशापूर-रा.म. 52 रस्ता सुधारणा करणे 1.5 कोटी,  सावतखेड ते कुमठा रस्ता सुधारणा करणे 1 कोटी,  कणबस-करजगी रस्ता सुधारणा करणे 1 कोटी,  बरूर-हत्तरसंग रस्ता सुधारणा करणे 1 कोटीबरूर टाकळी- राज्यमहामार्ग 211 सुधारणा करणे 1 कोटी.

दक्षिण मतदारसंघ राज्यात आदर्शवत करणार

          दक्षिण तालुक्यातील गावेवाड्यावस्त्यातांडे यांच्या विकासाकरिता आपण कायम कटिबद्ध असणार आहे. दक्षिण मतदारसंघ राज्यात आदर्शवत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांद्वारे तालुक्यात निधी आणून विकास कामे केली जातीलअसे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close