दुर्लक्षित महिलांच्या सत्काराने आनंद वाटला-डोंगरे
# झाडूवाल्या महिलांचा सत्कार करून महालक्ष्मी महिला पापड उद्योगाने केला महिला दिन साजरा.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आपल्या शहरांमध्ये कचरा वेचणाऱ्या महिला व झाडूवाल्या महिला या कायम दुर्लक्षितच राहिल्या आहेत. अशा दुर्लक्षित महिलांना व्यासपीठावर आणून त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे .शेवटच्या थरामध्ये काम करणाऱ्या महिलांना सन्मानित केले तरच खरा महिला दिन साजरा होईल. आज महालक्ष्मी पापड उद्योगाच्या वतीने झाडूवाल्या महिलांचा सत्कार करण्याचे भाग्य मिळाल्यामुळे खूप आनंद वाटत असल्याचे मत पापड उद्योग समूहाचे राजेश डोंगरे यांनी व्यक्त केले.
लक्ष्मी विष्णू चाळीतील महालक्ष्मी पापड उद्योगाच्या वतीने महापालिकेच्या सहा नंबर झोनमधील झाडूवाल्या महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी डोंगरे हे बोलत होते.
महानगरपालिकेच्या झोन क्रमांक सहामध्ये काम करणाऱ्या अनिता उघडे, शिवबाई बनसोडे, शालम्मा, नंदाबाई, शकुंतला, लक्ष्मी सोळंकी ,बाई कसबे, सुदेशना मोरे, साधना माने ,राजश्री हौसे, संध्या माने, पद्मिनी, दमयंती गायकवाड, लक्ष्मी पवार ,इंदुबाई वाघमारे, छाया नाईक आदींचा सत्कार महालक्ष्मी पापड उद्योगातील महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महालक्ष्मी महिला पापड उद्योगाच्या व्यवस्थापिका संपदा लक्ष्मण डोंगरे, लक्ष्मी बंडगर, संगीता हरवाळकर गीता डुकरे विजाली गुंड ,सुनीता खांडेकर, उषा नायडू, अशा मोरे ,काविरा गायकवाड, वैशाली लामतुरे सुनंदा गोपने ताई येरम, रोहिणी थोरात, सरस्वती गुंड, मीना चांगभले, रुक्मिणी मातोळे, आधी जण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी बंडगर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय डोंगरे यांनी मानले.
0 Comments