Hot Posts

6/recent/ticker-posts

खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी जावेद पटेल तर कार्याध्यक्षपदी राजू जमादार यांची निवड

 खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी जावेद पटेल तर कार्याध्यक्षपदी राजू जमादार यांची निवड

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी जावेद पटेल तर कार्याध्यक्षपदी राजू जमादार यांची निवड करण्यात आली.

संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक सुनिल कामाठी व मावळते अध्यक्ष आकाश येळणे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थित बैठक झाली. यावेळी ही निवड करण्यात आली.

मंडळाचे अन्य पदाधिकारी पुढीप्रमाणे -

उपाध्यक्ष - महेश खानोरे, कृष्णा सूरवसे, खजिनदार - अतिश येळणे, महेश पवार, सचिव - आकाश चव्हाण, मिरवणूक लेझीम प्रमुख प्रवीण वाडेकर, रमेश विटकर, डेकोरेशन प्रमुख - प्रशांत उंबरे, राजकुमार पाटील, पूजा प्रमुख - गणेश भोसले, शुभम माने,प्रसिध्दी प्रमुख निखील बिराजदार, ऋषिकेश पांढरे, सल्लागार - दादा पवार, जावेद सय्यद, अशपाक घडीवाले, अबिद घडीवाले, हुसैन टोनसाळ यांची निवड करण्यात आली.

यावेळी मंडळातर्फे नुतन उत्सव पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आली.

यावेळी मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक सल्लागार जगन्नाथ काळे, राजू चौगुले, मच्छिंद्र जाधव, किशोर येळणे, रंगनाथ पवार, मल्लिकार्जुन पाटील, मारुती विटकर, महादू शिंदे यांच्यासह नगरसेवक रविसिंह कैय्यावाले, आनंद मनसावाले, विठ्ठल फटफटवाले, राजेश परदेशी आदींची उपस्थिती होती.

बैठकीचे सुत्रसंचालन राजकुमार माने तर आभार आकाश कामाठी यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments