मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या इंटरनेटच्या युगामध्ये लाल मातीतले मैदानी खेळ कालबाह्य होत आहेत. परंतु क्रीडा महोत्सवासारख्या उपक्रमातून अशा मैदानी खेळांना पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळत असून अशा उपक्रमातून देशासाठी भविष्यात दर्जेदार खेळाडू मिळतील असं प्रतिपादन श्रद्धा विद्या मंदिर आणि श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुनील झाडे यांनी केले.
दिनांक 26 डिसेंबर आणि 27 डिसेंबर 2022 रोजी श्रद्धा विद्या मंदिर मोहोळ येथे क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी झाडे बोलत होते.
या क्रीडा महोत्सवाच्या आयोजन प्रशालेच्या मैदानावर करण्यात आलं होतं त्यासाठी मैदान सुद्धा सजविण्यात आले होते. कार्यक्रमाचा आरंभ सरस्वतीच्या प्रतिमापूजनाने करून त्यानंतर मैदानाची पूजा करण्यात आली. त्याचबरोबर क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा प्रतिज्ञा सुद्धा घेण्यात आली.
एकंदरीत या क्रीडा महोत्सवामुळे विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना खेळाडू वृत्ती आणि जिज्ञासू वृत्तीची ओळख झाल्याचे दिसून आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक दिनेश नरळे यांनी केले.
सर्वसामान्य अतिशय नीटनेटक्या नियोजनामुळे व्यवस्थित पार पडले. सर्व खेळाडूंना व्यवस्थित खेळ खेळता यावेत यासाठी अतिशय सुरेख आणि नेटकनयोजन करण्यात आलं होतं.
सर्व विद्यार्थ्यांनी या क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिक्षकांनी सुद्धा आपापल्या संघाला मुलाचं मार्गदर्शन केल्यामुळे दोन दिवस हा क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साही आणि आनंदमय वातावरणामध्ये पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धरती पाटील आणि प्रशालेचे मुख्याध्यापक दिनेश नरळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
क्रीडा महोत्सव मोठ्या व्यवस्थितपणे फार पडल्यामुळे प्रचारातर्फे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
No comments:
Post a Comment