रस्ता सुरक्षेचे महत्त्व कळण्यासाठी कवच कक्ष उपयुक्त– जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उद्घाटन
.jpeg)
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- शालेय विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य आहेत. त्यांना विद्यार्थी दशेतच रस्ता सुरक्षेचे महत्त्व कळणे आवश्यक असून, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू करण्यात आलेला सुरक्षा कवच कक्ष त्यासाठी मदतीचा ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरक्षा कवच कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे तर विशेष अतिथी म्हणून अतिरीक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव उपस्थित होते.
.jpeg)
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर अर्चना गायकवाड यांनी या सुरक्षा कक्षाची माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये रस्ता सुरक्षेचे महत्त्व कळावे, याकरिता सुरक्षा कवच स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये रस्ता सुरक्षेचे महत्त्व विषद करणारे विविध कक्ष स्थापन केले आहेत. जसे की साप शिडी खेळ, रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत स्पर्धा तसेच मुलांना शालेय साहित्याच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटावे याकरिता पेन पेन्सिल, फ्रेंडशिप बँड, स्टिकर्स, डायरी, ग्रीटिंग्स इत्यादिचे वाटप या कक्षातून केले जाणार आहे.
0 Comments