Hot Posts

6/recent/ticker-posts

आंतरजातीय विवाह करणाऱ्या 50 जोडप्यांना अनुदान वाटप

 आंतरजातीय विवाह करणाऱ्या 50 जोडप्यांना अनुदान वाटप

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेंतर्गत जिल्हा परिषद  समाज कल्याण विभागाच्या वतीने  50 लाभार्थी जोडप्यांना  प्राप्त तरतुदीनुसार अनुदान मंजूर करण्यात आले.  मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या  हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात चार जोडप्यांचा सत्कार करुन धनादेश देण्यात आला.


आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेंतर्गत  रोहित सुनील कांबळे व प्राजक्ता बंडू ताठे , सुनील खोबु राठोड व पूजा गुरुनाथ बाके, अक्षय देविदास बारामतीकर व विश्व विजेती दीपक गायकवाड, ओंकार गजानन शिरसीकर व प्रिया विठ्ठल हुल्ले या जोडप्यांचा सत्कार करुन धनादेशाचे वाटप करण्यात आले. मनिषा आव्हाळे यांनी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनीही काही जोडप्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


यावेळी मोनिका हिरेमठ, शीतल कंदलगावकर, सच्चिदानंद बांगर, स्वाती गायकवाड, शशी ढेकळे, सावळा काळे, अतुल मुकटे, कमलाकर तिकटे आदि उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments