Hot Posts

6/recent/ticker-posts

तालुक्यात आ. बबनराव शिंदेचे एकहाती वर्चस्व कायम,भोसरे,घाटणेत घडले सत्तांतर 

माढा तालुक्यात आमदार बबनराव शिंदेचे एकहाती वर्चस्व कायम,भोसरे,घाटणेत घडले सत्तांतर 

माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यात पार पडलेल्या ८ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातुन माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेचे एकहाती वर्चस्व असल्याचे स्पष्ठ झाले आहे.
भोसरे,घाटणे या दोन ग्रामपंचायत मध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे.गेल्या ६ टर्म पासुन माढ्याचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या आमदार शिंदेचे तालुक्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता आहे.या निवडणुक निकालातुन पुन्हा एकदा आमदार शिंदेची तालुक्यावर 
एकहाती पकड असल्याचे सिद्ध झाले आहे.
भोसरेत सत्तेत असलेल्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.युवा सेनेचे अध्यक्ष सचिन बागल व आरपिआयचे राज्य उपाध्यक्ष बापुसाहेब जगताप पॅनलचा राष्ट्रवादीचे माजी ता.प.सदस्य सुरेश बागल यांनी सरपंच पदासह पराभव करुन विजय खेचला आहे.तर गेल्या अनेक वर्षापासुन संजय पाटील घाटणेकर यांच्याकडे घाटणे गावची सत्ता होती.यंदाच्या निवडणुकीत मात्र आमदार संजय शिंदे गटाच्या उमेश कदम यांनी घाटणेकरांचा दारुण पराभव केलाय.दारफळ मध्ये आमदार शिंदेचे पॅनल विजयी झाले असुन विरोधी साठे सावंत गटाला १ जागा मिळालीय.चिंचोलीत संतोष लोंढे गटाला बहुमत आले असुन ते सरपंच म्हणुन निवडुन आलेत.तर डाॅ.विजयकुमार लोंढे गटाचा पराभव झाला आहे.चौभेपिंपरीत आ.संजय शिंदेचे समर्थक विक्रम उरमुडे यांचा पॅनल पराभुत झाला असुन आमदार बबनराव शिंदे गटाचे योगेश जाधव यांनी सत्ता खेचुन आणली आहे.भेंड मध्ये आमदार शिंदे समर्थक डाॅ.संतोष दळवी पॅनल विजयी झाला असुन त्यांच्या पत्नी मनिषा दळवी सरपंच झालेत.रोपळे खुर्द गावात 
६५ वर्षीय शांताबाई काळे या पारधी समाजाची महिला सरपंच झालीय.एकदंरीतच यंदाच्या निवडणुकीत नागरिकांचा कल परिवर्तनाचा असला तरी दुसरा गट ही मात्र बबनदादांचा विजयी झालेला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments