आण्णाभाऊ साठे मध्यवर्ती उत्सव समिती च्या अध्यक्षपदी अभिजीत पवार तर उपाध्यक्ष पदी अभिषेक पवार ; एकमताने निवडी पडल्या पार

माढा (कटूसत्य वृत्त):- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जन्मोत्सव १ ऑगस्ट ला साजरा होतो आहे.माढ्यात विविध उपक्रमांनी जयंती सोहळा पार पडतो. माढा शहरात लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अभिजीत पवार तर उपाध्यक्ष पदी अभिषेक पवार यांची एकमताने निवड झाली.उत्सव समितीच्या निवडी करण्यासाठी समाज बांधवाची बैठक पार पडली.या बैठकीत सर्व निवडी शांततेत आणि एकमताने पार पडल्या. खजिनदार पदी रुपेश थोरात तर सचिव पदी निलेश देवकुळे यांची एकमताने निवड झाली. यावेळी नुतन पदाधिकारी यांचा सन्मान आला.
0 Comments