सीईओ स्वामींनी खरेदी केल्या "चटण्या" अन् अतिरिक्त सीईओ धोत्रे यांनी "कुरुड्या पापड्या आणि सांडगे"
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामविकास विभागाच्या महाआवास अभियान ग्रामीण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर यांच्यावतीने बांधण्यात आलेल्या जिल्हास्तरीय डेमो हाऊस मध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ तसेच वस्तू विक्री करण्यासाठी कॉप-शॉपचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकल्प संचालक संतोष धोत्रे, सहाय्यक प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी, उमेद अभियान जिल्हा व्यवस्थापक सचिन चवरे, कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उद्घाटनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी स्वतः विविध प्रकारच्या चटण्या खरेदी केल्या, त्याचबरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे यांनी सांडगे खरेदी केले.
दरम्यान सीईओ स्वामी म्हणाले, ज्या ज्या तालुक्यांमध्ये डेमो हाऊस बांधण्यात आले आहेत तिथे महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी सोय करण्यात येणार आहे. बचत गटाच्या वस्तू या चांगल्या पद्धतीच्या असतात त्यामध्ये कोणतीही भेसळ नसते त्यामुळे नागरिकांनी त्या खरेदी कराव्यात असे आवाहन स्वामी यांनी केले.
प्रकल्प संचालक धोत्रे म्हणाले, जिल्हास्तरीय डेमो हाऊस ग्रामीण विकास यंत्रणेच्या आवारात बांधण्यात आले आहे. त्याच्यावरच उत्तर पंचायत समितीचे डेमो हाऊस बांधण्यात येणार आहे आणि हे दोन्हीही बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी देण्यात येणार असून त्यांनी कॉप-शॉप मागील संकल्पना स्पष्ट केली.
0 Comments