Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा

                सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दिलीप स्वामी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या कल्पनेतून जिल्हा परिषद सेवेतील वैद्यकीय अधिकारी व प्रशासनातील डॉक्टर्स यांच्या कामाला कौतुकाची थाप म्हणून दि.१ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे अनुषंगाने यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद सोलापूर मध्ये साजरा करण्यात आला. प्रारंभी आरोग्य देवता धन्वंतरी मूर्ती पूजन व स्तवन मान्यवरांच्या हस्ते झाले.

                व्यासपीठावर डॉ शीतलकुमार जाधव जिल्हा आरोग्य अधिकारी,  इशादीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ सोनिया बागडे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ अनिरुद्ध पिंपळे जिल्हा माता व  बालसंगोपन अधिकारी, डॉ अमित पाटील,डाॅ इरफान सय्यद,  आदी उपस्थित होते.

                कार्यक्रमाच्या प्रस्तावना वेळी आजच्या दिवसाचे महत्त्व भारतरत्न डॉ. बी.सी रॉय यांची १जुलै जन्मतिथी व पुण्यतिथी असून त्यांचे आरोग्य सेवेतील अमूल्य योगदान लक्षात घेऊन भारतामध्ये १९९१ पासून डॉक्टर्स डे १ जुलै रोजी साजरा केला जात आहे. श्री दिलीप स्वामी  यांनी डॉक्टरांनी कोविड कामकाजामध्ये तसेच जनसंजीवनी कार्यक्रमातून आरोग्य संस्थांना एका नवीन उंचीवर घेऊन गेल्याने सर्वांचे अभिनंदन केले. तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये सोलापूर जिल्हा  महाराष्ट्रात ३ रा क्रमांकावर आल्याने सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना कौतुकाची थाप दिली.

                प्रातिनिधीक स्वरूपामध्ये उत्कृष्ट कामकाजाबद्दल डॉ बाबासाहेब गाढवे, डॉ प्रतिभा गायकवाड, डॉ डी जी शिंदे या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

                रुग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम डॉक्टर करीत असतात आणि चिकित्सा करण्यासाठी मुख्य चतुष्पाद आहेत, त्यामधील डॉक्टर, नर्स, रुग्ण व औषध असून यामध्ये डॉक्टरची भूमिका प्रमुख आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी दक्षिण व उत्तर तसेच प्रा आ केंद्र व आयुर्वेद दवाखाना येथील वैद्यकीय अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

                यावेळी डॉ सोनिया बागडे  डॉ अनिरुद्ध पिंपळे डॉ मोहन शेगर आदी डॉक्टरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. नवनिर्मित  नर्सेस संघटनेच्या वतीने आरोग्य सहायिका फुलारी यांनी मनोगत व्यक्त केले.

                आरोग्य सेवेत कामामध्ये चैतन्य आणल्याबद्दल व सतत प्रोत्साहन देत अनेक उपक्रम यशस्वी रित्या पुर्ण केल्याबद्दल मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे धन्यवाद मानले व अजून बरेच काही साध्य करायचं आहे.  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी असेच मार्गदर्शन व साथ दिली तर ते शक्य आहे असे डाॅ. शितल कुमार जाधव जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केले:

                कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विलास सरवदे जिल्हा आयुष अधिकारी व आभार प्रदर्शन डॉ अमित पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रतिज्ञेनी झाली. यावेळी जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नियोजन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments