Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांनी प्रक्रिया प्रकल्प उभा करावेत - रवींद्र कांबळे

शेतकऱ्यांनी प्रक्रिया प्रकल्प उभा करावेत - रवींद्र कांबळे

करमाळा पंचायत समितीमध्ये कृषी दिन साजरा
कृषी खात्यामार्फत 13 कोटी रुपयांची शेतकऱ्यांना अनुदान

                करमाळा (कटूसत्य वृत्त):- स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एकही भूकबळी झाला नाही पाहिजे अन्नधान्य उत्पादनात देश सक्षम झाला पाहिजे यासाठी चळवळ उभा केली व त्याचे फलित म्हणून आज भारत देश स्वतःची अन्नधान्याची गरज भागवून निम्म्या जगाला अन्नपूर्वल एवढं उत्पादन क्षमता वाढली आहे आता मात्र शेतकऱ्यांनी प्रक्रिया प्रकल्प उभा करून आर्थिक उन्नती केली पाहिजे असे मत उपविभाग विभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे यांनी व्यक्त केले आज करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कृषी दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवाटे उपस्थित होते.

                यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे राजाराम भोंग देविदास चौधरी देवा सारंगकर कृषी विस्तार अधिकारी शंकर मिरगणे प्रगतशील शेतकरी किरण डोके संदीप यादव बाळासाहेब काळे आधी जण उपस्थित होते.यावेळी करमाळा तालुक्यात पीक उत्पादन स्पर्धेत बक्षीस मिळवलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

                होळी बोलताना महेश चिवाटे म्हणाले की रासायनिक खते व किटकनाशकामुळे मनुष्यांचे हानी होत असून दूषित विषजन्य अन्नधान्यामुळे आरोग्य धोक्यात येत आहे यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करण्याचे धोरण अवलंब करावा यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे म्हणाले की करमाळा तालुक्यात दोन वर्षात 13 कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहे या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना विहीर शेती उपयोगी साधने दाळ प्रक्रिया प्रकल्प कांदा चाळ अशा योजना मंजूर झाले म्हणून कार्यरत झाले आहे.

                यावेळी आवळा उत्पादनातून आठ एकरातून 40 लाख रुपयांचे उत्पादन मिळवलेले बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments