Hot Posts

6/recent/ticker-posts

ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात पावसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

 ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात पावसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

                  

तब्बल दोन वर्षानंतर महाविद्यालयामध्ये विद्यार्थी लुटू लागले स्पर्धांचा आनंद

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शांती एज्युकेशन सोसायटी संचलित, ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर यांच्या वतीने वार्षिक पावसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.दि.15 ते 17 जून 2022 दरम्यान क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, असे विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, क्रीडा स्पर्धेच्या उदघाट्न संस्थेचे संचालक शिवानंद पाटील यांच्या हस्ते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.ए. पाटील,उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार, डॉ. गडवाल, डॉ. दरेकर, प्रा. कुलकर्णी, प्रा.मसलेकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.उदघाट्न प्रसंगी बोलताना शिवानंद पाटील खेळाडूंनी शिस्तीचे पालन करून खेळ भावना जोपासावे असे आवाहन केले तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विश्वजीत पोतदार यांनी अभ्यासाबरोबरच खेळ सुद्धा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. कोरे एस. एस.यांनी केले तर आभार प्रा. विवेक भोगडे यांनी मानले.



Reactions

Post a Comment

0 Comments