Hot Posts

6/recent/ticker-posts

एमपीएससीचा मोठा निर्णय, वयोमर्यादेत कितीही वेळा परीक्षा देता येणार

 एमपीएससीचा मोठा निर्णय, वयोमर्यादेत कितीही वेळा परीक्षा देता येणार

मुंबई (कटूसत्य वृत्त):- एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवरांसाठी एक मोठी बातमी आणि आनंदाची बातमी आली समोर आली आहे.कारण आता एमपीएससीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. संधीची मर्यादा आता एमपीएसीकडून हटवण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचा मार्ग सुकर झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती एमपीएससीच्या ट्विटवरून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरचं एक मोठं कोडं आता सुटलं आहे. आधी संधींच्या मर्यादेमुळे अनेकांना आपल्या ध्येयापासून मुकावं लागत होतं. मात्र आता तसे प्रकार घडणार नाहीत.

आधी संधींच्या मर्यादा असल्यामुळे दिलेल्या संधींमध्येच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळत होती. त्यामुळे अनेकांना मर्यादा संपल्यावर परीक्षा देत येत नव्हते. त्यानंतर इच्छा नसतानाही इतर पर्यायी मार्गांचा स्वीकार करावा लागत असे, आता मात्र तसे होणार नाही. काही वेळेस अपयश आले तरी वयोमर्यादा आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे ही बातमी स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह नक्कीच वाढवणारी आहे. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांकडूनही आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाकाळात इतर विद्यार्थ्यांसोबतच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचेही मोठं नुकसान झालं आहे. अनेकवेळा एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे अनेकांना वयोमर्यादेमुळेही परीक्षा देता आल्या नव्हत्या. तर अनेक विद्यार्थ्यांच्या नियुक्त्याही रखडल्या होत्या. त्यासाठी अनेकदा एसपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचेही दिसून आले आहे. आता गेल्या दोन वर्षातलं उमेदवारांचं नुकसान भरून काढण्यासाठी एमपीएससी आयोगाकडून तातडीने पाऊलं उचलली जात आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments