महाराष्ट्राला स्थिर सरकार पाहीजे,संभाजी ब्रिगेड मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सोबत - ॲड. मनोज आखरे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रात सूडबुद्धी च आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. जाणिवपुर्वक सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्ष वेगवेगळे षडयंत्र करत आहेत. अडीच वर्षातच भाजपचा सत्तापिपासू वृत्तीमुळे बाजार उठला, हे केंद्रापासून राज्यापर्यंत कोणालाही सहन होत नाही. कोणताही सरकार सत्तेवर आल्यानंतर ते त्या पक्षाचे राहत नाही तर ते मायबाप सरकार असतं. लोकांना विकासाची, मदतीची आणि रोजगाराची गरज आहे.
महाराष्ट्र संकटात असताना शिवसेनाच्या आमदारांना फोडण्याचे कारणं वेगळी आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये होणारे हजारो कोटींचा भ्रष्टाचार थांबवण्याचे काम मुख्यमंत्री करत असतील तर मंत्र्यांच्या पोटात सहाजिकच दुखत असेल, हीच घाणेरडी वृत्ती महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. एकनाथ शिंदे यांनी ठरवून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपच्या आशीर्वादाने करत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या विकासाला हे छेद देणारं आहे.
संभाजी ब्रिगेड समृद्ध महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित आहे. आम्हाला एक संघ महाराष्ट्र ठेवायचा आहे. जर मुख्यमंत्री किंवा महाविकास आघाडी सरकार अडचणीत असेल तर आमची नैतिक जबाबदारी आहे आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आहोत. अडचणीच्या काळात मदत करणं हे संभाजी ब्रिगेडच्या विचारांचं काम आहे. सुडबुद्धीच्या घाणेरड्या राजकारणात गरज पडली तर आम्ही सगळे समविचारी एकत्र मिळून महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे सोबत राहू हा आमचा शब्द आहे. 'प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू मुख्यमंत्री झाला यामुळे सुद्धा कदाचित आरएसएस च्या पोटामध्ये गोळा आला असेल...' म्हणून कडाडून विरोध होत आहे, आम्ही तो हाणून पाढू.
सरकारने लोकांच्या हितासाठी चांगलं काम करावं. शेतकरी, कष्टकरी, कामगार व सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाचे हीत जपावं यासाठी आम्ही महाविकास आघाडी च्या सोबत आहोत अशी घोषणा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे साहेब यांनी जाहीर केला आहे. सर्व कार्यकर्ते अडचणीच्या काळात आम्ही आपल्या सोबत आहोत. वेळ पडली तर महाराष्ट्रामध्ये घाणेरडे राजकारण करणाऱ्यांचा 100 टक्के बंदोबस्त करण्याचे काम संभाजी ब्रिगेड करेल यात शंका नाही.
0 Comments