श्रीसंत कुर्मदास साखर कारखाना निवडणुक बिनविरोध, केवळ प्रशासनाच्या घोषणेची औपचारिकता बाकी

माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील पडसाळी येथील श्रीसंत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याची चौथी पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली आहे. प्रशासनाकडून केवळ घोषणेची औपचारिकता बाकी उरली आहे.
१७ संचालकांच्या जागेसाठी १७ जणांचेच अर्ज आलेत.शुक्रवारी अर्ज छाननीच्या दिवशी निवडणुक निर्णय अधिकारी ज्योती कदम यांनी अर्जाची तपासणी केली असता सर्व अर्ज वैध ठरले.यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण,उपनिबंधक सुधाकर लेंडवे,नायब तहसीलदार आर.आर.कदम आदी उपस्थित होते.
कॉग्रेसचे माजी आमदार तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन अॅड.धनाजीराव साठे यांचेसमवेत संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.दरम्यान १७ जागेसाठी १७ उमेदवारांचेच अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडणुकीचा अर्ज मोकळा झाला आहे.२००५ साली कारखान्याची पहिली निवडणुक झाली.सलग ४ टर्म पासुन कारखाना निवडणुक बिनविरोध होत आली आहे.स्व.विलासराव देशमुख यांच्या मोठ्या सहकार्याच्या बळावर माजी आ.धनाजीराव साठे यांनी या कारखान्याची उभारणी केली होती.कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच माढ्यात व कारखाना स्थळी साठे समर्थकांनी फटाके फोडुन जल्लोष साजरा केला.माजी आ.चेअरमन धनाजीराव साठे यांचा देखील नवनियुक्त संचालकांनी सत्कार केला.
यावेळी बी.डी.पाटील,दादासाहेब साठे,विजयसिंह पाटील, राहुल पाटील,शालिनी कदम,संध्याराणी खरात,बाळासाहेब पाटील,भालचंद्र पाटील,सयाजी पाटील,मधुकर चव्हाण,नारायण गायकवाड,सुधीर पाटील,शशिकांत देशमुख,हरिदास खताळ,सिराज शेख,शंकर नाईकवाडे,विठ्ठल शिंदे,बालाजी पाटील,बालाजी मजमुले,हनुमंत राऊत आदी उपस्थित होते.
ऊस उत्पादक शेतकरी आणी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाने दाखवलेल्या विश्वासामुळेच कारखान्याची ४ थी निवडणुक बिनविरोध झाली.१२५० मे.टन क्षमता असलेला कारखाना २५०० मे.टन करणार असुन स्वत:ची मालमत्ता(प्रापर्टी) विकुन ऊस उत्पादक शेतकर्याचे पैसे दिले आहेत.एकाही शेतकर्याचे पैसा कारखान्याकडुन थकवले जात नाहीत.स.म.गणपतराव साठे,स्व.विलासराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा सोबतीला घेऊन कारखाना यापुढे ही सक्षमपणे वाटचाल करेल-माजी आ.धनाजीराव साठे माढा
No comments:
Post a Comment