Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा रोटरी क्लब मध्ये आता महिला राज,अध्यक्षपदी संगिता पाडुळे तर सचिव पदी उज्वला वेदपाठक यांची निवड,पदग्रहण समारंभ थाटात

 माढा रोटरी  क्लब मध्ये आता महिला राज,अध्यक्षपदी संगिता पाडुळे तर सचिव पदी उज्वला वेदपाठक यांची निवड,पदग्रहण समारंभ थाटात 

माढा (कटूसत्य वृत्त):-महिलांच्या हाती रोटरीचा कारभार देऊन माढ्याने  राज्यात आदर्श घडविला असुन हे क्रांतीकारी पाऊल असल्याचे माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे यावेळी बोलताना सांगितले.माढा रोटरी क्लब मध्ये महिलाराज आले असुन अध्यक्षपदी संगिता  हनुमंत पाडुळे यांची तर सचिवपदी उज्वला वेदपाठक यांची निवड करण्यात आली.२०२२-२३ च्या  नुतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ जगदाळे मंगल कार्यालयात थाटामाटात पार पडला.यावेळी नगराध्यक्षा अॅड.साठे प्रमुख मान्यवर  म्हणुन बोलत होत्या. यावेळी मंचावर माजी आ.धनाजीराव साठे,नगराध्यक्षा अॅड मीनल साठे,माढा वेल्फेअर फौंडेशन चे अध्यक्ष धनराज शिंदे,प्रभारी सपोनि किरण घोंगडे यांच्या  प्रमुख उपस्थिती पदग्रहण समारंभ पार पडला.

रोटरी चे माजी अध्यक्ष सचिन घाडगे व सचिव बंडु पवार यांनी नुतन पदाधिकारी यांच्याकडे पदभार सोपविला.संगिता पाडुळे व उज्वला वेदपाठक यांनी रोटरीच्या  संस्थेची शपथ घेऊन पदभार स्विकारला.

यावेळी रोटरी क्लब,दिपक जगताप,फक्त सह्याद्री परिवार,शहाजी चवरे राष्ट्रवादी यांचे  वतीने नुतन अध्यक्ष सचिव यांचा विशेष  सन्मान करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी महिला पदाधिकारी यांना शुभेच्छा देऊन सदिच्छा दिल्या.पदग्रहण समारंभात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.यावेळी उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,नगरसेविका सुनिता राऊत,शबाना राऊत,गितांजली देशमुख,रोटरीचे संस्थापक डाॅ.सोमेश्वर टोंगळे,उपप्रांतपाल डाॅ.सुभाष पाटील,बाजार समितीचे संचालक हनुमंत पाडुळे,डाॅ.विनोद शहा,डाॅ.राजकुमार आडकर,प्रमोद वेदपाठक,शिवाजी जगदाळे,नागनाथ घाडगे,सचिन घाडगे,दत्ताजी शिंदे,रमेश पाडुळे किरण चव्हाण,भारत लटके,बंडू पवार,गौरव पाडुळे यांचेसह अन्य  रोटरीचे सदस्य पदाधिकारी  शहरवासिय उपस्थित होते.रमेश कदम यांनी सुत्रसंचलन तर आभार औदुंबर पवार यांनी मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments