ज्येष्ठांना आधार देण्यासाठीच मनोधैर्य योजना - रोटेरियन ओम मोतीपावळे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एकटे राहणारे ज्येष्ठ नागरीकांना शारीरीक व मानसिक आधार देण्यासाठी सोलापूरमध्ये मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून चांगले काम होईल अशी अपेक्षा रोटरीक्लबचे जिल्हा प्रांतपाल ओम मोतीपावळे यांनी व्यक्त केली. रोटरी क्लब सोलापूर आणि पुण्यातील मायकेअर या सामाजिक संस्थेकडून सोलापूरमध्ये ज्येष्ठ नागरीकांसाठी मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली त्याचे उद्घाटन मंगळवार दि. 21 जून रोजी मेसॉनिक हॉल येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
समाजासाठी नेहमी काहीतरी वेगळे देण्याचे काम रोटरीक्लब सोलापूरचे अध्यक्ष संजय पटेल आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जाते. त्याचाच भाग म्हणजे मनोधैर्य योजना आहे. असेही मोतीपावळे यांनी सांगितले. प्रारंभी सोलापूर रोटरीक्लब चे अध्यक्ष संजय पटेल यांनी मनोधैर्य या योजनेची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. करियरच्या निमित्ताने बाहेरगावी असलेल्या मुलां मुलींचे पालक हे एकटे राहात असतात अशा ज्येष्ठ नागरीकांना मूलभूत सोई सुविधांसाठी, शारीरीक व मानसिक मदतीसाठी कोणाची तरी आपल्या जवळच्या व्यक्तीची गरज असते ती गरज स्वयंसेवकांकडून पूर्ण करण्याची योजना म्हणजे मनोधैर्य आहे. कोणताही मोबदला न घेता मदतीचा हात देण्यासाठी रोटरीक्लब च्या वतीने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रारंभी भारतीय स्टेट बँकेतील निवृत्त ज्येष्ठ आणि एकटे राहणाऱ्या नागरीकांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. काही दिवसानंतर ही योजना सर्वच ज्येष्ठ नागरीकांसाठी सुरू होणार असल्याचेही यावेळी संजय पटेल यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांता येळंबकर यांनी केले. रोटरीक्लब च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेचा लाभ ज्यांना गरज आहे अशा ज्येष्ठ नागरीकांनी घ्यावा असे आवाहन सचिव कौशिक शहा यांनी करून आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी पीडीजी जुबीन अमेरिया, कालिदास जाजू, सुनिल माहेश्वरी, विशाल वर्मा, प्रशांत नुले, गोवर्धन चाटला, डॉ. ज्योती चिडगुपकर, एजी शिवाजी उपरे, शांता येळंबकर, निकीता पटेल, प्रिती शहा, विद्या मनोरे, डिस्ट्र्निट सेक्रेटरी रविंद्र बनकर, लक्ष्मीकांत सोनी यांच्यासह पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरीक तसेच भारतीय स्टेट बँक पेन्शर मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments