पंढरपूर पॅसेंजरसह २८ रेल्वेगाड्या आठ दिवसांसाठी रद्द
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भुसावळ विभागाच्या मनमाड-अंकाई किल्ला रेल्वे स्थानकादरम्यान यार्ड रिमोल्डिंग आणि दुहेरीकरण रेल्वे ट्रॅक जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम २३ ते ३० जूनदरम्यान चालणार आहे. यासाठी आठ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास २८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या उशिरा धावणार आहेत. याचा सर्वाधिक फटका पंढरपूर- निजामाबाद दरम्यान पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. साईनगर शिर्डी- काकिनाडा पोर्ट, सिकंदराबाद- साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, दौंड-निजामाबाद आदी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नुकतीच शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. गर्दीचा हंगाम नसल्याने रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. दोन-तीन महिने आधीच तिकीट आरक्षित करून ठेवलेल्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.
रद्द झालेल्या पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्या
काकिनाडा पोर्ट- साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी- काकिनाडा पोर्ट, सिकंदराबाद- साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी- सिकंदराबाद, दौंड- निजामाबाद पॅसेंजर, निजामाबाद- दौंड पॅसेंजर, विशाखापट्टणम- साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी - विशाखापट्टणम, साईनगर शिर्डी- कालका, कालका- साईनगर शिर्डी, अंजनी- पुणे, पुणे- अंजनी, दादर- साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी- दादर, हडपसर- नांदेड, नांदेड- हडपसर, पुणे- दरभंगा, दरभंगा- पुणे, नागपूर- पुणे, पुणे- नागपूर, जसीडीह- पुणे, पुणे- जसीडीह, काझीपेठ- पुणे, पुणे-काझीपेठ, निजामाबाद- पंढरपूर, पंढरपूर- निजामाबाद पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
उशिरा धावणाऱ्या गाड्या
सिकंदराबाद-साईनगर शिर्डी ५० मिनिटे, काकिनाडा- साईनगर शिर्डी १५ मिनिटे, विजयवाडा- साईनगर शिर्डी ५० मिनिटे, जम्मूतावी- पुणे एक तास ५५ मिनिटे, काकिनाडा-साईनगर शिर्डी एक तास १५ मिनिटे, वास्को-द-गामा-हजरत निजामुद्दीन १० मिनिटे, जम्मूतावी- पुणे ४० मिनिटे, जम्मूतावी- पुणे दोन तास २० मिनिटे, वास्को-द-गामा-हजरत निजामुद्दीन उक तास २५ मिनिटे, हजरत निजामुद्दीन- वास्को-द-गामा ४० मिनिटे, सीएसएमटी- नांदेड ४५ मिनिटे, जम्मूतावी- पुणे एक तास ५० मिनिटे, वास्को-द-गामा-हजरत निजामुद्दीन ५५ मिनिटे उशिरा धावणार आहे.
0 Comments