Ads

Ads Area

शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! वेळेच्या अर्धा तास अगोदर शाळेत न येणारे शिक्षक बिनपगारी

 शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! वेळेच्या अर्धा तास अगोदर शाळेत न येणारे शिक्षक बिनपगारी

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- शाळेची वेळ सकाळी १० ते सायंकाळी साडेपाचपर्यंत असून, शनिवारी सकाळी आठ वाजता शाळा भरते. मात्र, शिक्षक वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची पंचाईत होते. या पार्श्वभूमीवर आता सर्व शिक्षकांनी शाळा भरण्यापूर्वी अर्धा तास अगोदर शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिले आहेत. जे शिक्षक वेळेवर येणार नाहीत, त्यांना त्या दिवशीचा पगार मिळणार नाही, अशी कारवाई केली जाणार आहे.

शाळेच्या वेळेत दुरून येणाऱ्या शिक्षकांना पोचता येत नसल्यास २४ जून २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे त्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहावे, असा नियम आहे. पण, परगावाहून येणारे बहुतेक शिक्षक गावात राहातच नाहीत. मागे अनेक शिक्षकांनी मुख्यालयात राहात असल्याचे प्रमाणपत्र दिले, पण प्रत्यक्षातील वस्तुस्थिती वेगळीच होती. आता मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याची सक्ती केली जाणार नाही, पण वेळेत शाळेत न येणाऱ्या शिक्षकांना त्या दिवशीचे वेतन मिळणार नाही. काही शाळांमध्ये शिक्षकांपेक्षाही अगोदर विद्यार्थी येतात, असे चित्र पाहायला मिळते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार म्हणाले. झेडपीच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर हातावरील पोट असलेल्यांचीच मुले असतात. त्यांची गुणवत्ता वाढवून त्यांना स्पर्धाक्षम बनविण्यासाठी प्रत्येक शाळाने तथा शिक्षकांनी वार्षिक नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. पेनूर (ता. मोहोळ) येथील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये शनिवारी १६ शिक्षक शाळा भरल्यानंतर आले. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी आता नवे आदेश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close