Hot Posts

6/recent/ticker-posts

अग्निवीर योजना केंद्र सरकारने रद्द करावी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

 अग्निवीर योजना केंद्र सरकारने रद्द करावी
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी 


पंढरपूर  (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी सैन्य दलातील भरतीबाबत अग्निवीर योजना जाहीर केली असून त्यात सेवेची केवळ चार वर्ष मर्यादा ठेवण्यात आली आहे. मुळात हा विषय येतो की जो युवक देशाची सेवा करत असताना त्याच्या जीवाची पर्वा न करता ही सेवा करत असतो अन्‌ आज केंद्र सरकारने आणलेली ही अग्निवीर योजना म्हणजे जवानांचा अवमान करणारी योजना आहे. चार वर्षानंतर पुन्हा काय करायचे त्याचे पुढचे भवितव्य काय त्यामुळे ही योजना रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे व पंढरपूर शहराध्यक्ष स्वप्निल जगताप यांनी निवेदनाद्वारे पंढरपूरचे तहसिलदार यांच्याकडे केली असून सदरचे निवेदन नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांनी स्वीकारले असून ते निवेदन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेले आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे,जिल्हा संघटक सारंग महामुनी,तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण,पंढरपूर शहर उपाध्यक्ष सुरज गंगेकर,शाम पवार,विश्वजित व्यवहारे, शुभम पवार , यश महालिंगडे आदि राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
वास्तविक पाहता केंद्रातील भाजप सरकारने सत्तेवर येताना प्रत्येक वर्षी 2 कोटी म्हणजेच 5 वर्षात 10 कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा केलेली होती त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. नोटाबंदी, जीएसटी अशा कायद्यांमुळे अनेक छोट्या कंपन्या व रोजगार व्यवस्था बंद पडलेल्या आहेत. शेतीला हमीभाव नाही. अनेक वर्ष अभ्यास करून मेहनतीने युवक भरती होत असतो. अशातच बेरोजगार तरूणांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्र सरकारने या अग्निवीर योजनेच्या माध्यमातून केलेले आहे. कारण सैन्यात भरती होणे युवकासाठी व त्याच्या कुटूंबियांसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र केवळ 4 वर्ष सेवा करून पुन्हा माघारी आपल्या घरी यावे लागणार असल्यामुळे त्या युवकाच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments