Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यात सोमवारी 2354 नव्या रुग्णांची नोंद तर 1485 रुग्ण कोरोनामुक्त

 राज्यात सोमवारी 2354 नव्या रुग्णांची नोंद तर 1485 रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (कटूसत्य वृत्त):- गेल्या काही दिवसांच्या तुलनेत राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीत आज काहीशी घट झाल्याचं दिसून आलं.राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या तीन हजारांच्या आत आली असून आज 2354 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1485 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 1310 रुग्णांची भर पडली आहे.

राज्यात आज एकूण दोन कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,65,602 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.83 टक्के इतकं झालं आहे.

राज्यात आज एकूण 24,613 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 14089 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 5522 सक्रिय रुग्ण आहेत.देशातल मागील 24 तासांत 12 हजार 781 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत जरी घट झाली असली तरी कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. रविवारी दिवसभरात 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 8 हजार 537 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.61 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर दैनंदिन सकारात्मकतेचा दर 4.32 टक्के इतका झाला आहे. भारतात रविवारी दिवसभरात 2 लाख 96 हजार 50 नमुन्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत देशात एकूण 85.81 कोटीहून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत.


Reactions

Post a Comment

0 Comments