नुपूर शर्माच्या यांच्या समर्थनाच स्टेटस ठेवल्यामुळे सोलापुरात तरुणाला मारहाण

मुंबई (कटूसत्य वृत्त):- भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनाचं स्टेटस ठेवणं, एका तरुणाला चांगलच महाग पडलय. नुपूर शर्मा यांचं समर्थन करणारं स्टेटस ठेवल्यामुळे या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली.मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवण्यात आलीय. नुपूर शर्मा यांनी अलीकडेच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे देशभरात त्यांच्याविरोधात निदर्शन सुरु आहेत. त्यातच आता सोलापूरात ही घटना घडली आहे.
0 Comments