जलशक्ती अभियानाची पाहणी करण्यासाठीकेंद्रीय पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीआढावा बैठकीत जिल्ह्यातील कामाची दिली माहिती
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):-जलशक्ती अभियान ‘कॅच द रेन’ या उपक्रमात सोलापूर जिल्ह्यातील कामांचा आढावा आणि पाहणी करण्यासाठीकेंद्रीय पथक आजपासून 19 जूनपर्यंत चार दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेआहे. नियोजन भवन येथे पथकाला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातीलकामांची माहिती दिली. पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब अन थेंब वाचविण्यासाठीजलशक्ती अभियान मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दिल्ली येथील केंद्रीय उच्च शिक्षण विभागाचेसंचालक प्रशांत अग्रवाल, पुणे येथील केंद्रीय जल, भूमी व संशोधन संस्थचे वैज्ञानिक भूषण तायडे या दोन तज्ञ सदस्यांच्या पथकानेजिल्ह्यातील विविध विभागाद्वारे जलशक्ती अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या विविधकामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी अण्णासाहेब कदम, रोहयोच्या उपजिल्हाधिकारीचारूशिला देशमुख, कृषी उपसंचालक मोरे यांच्यासह जिल्हा भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील कामांचे सादरीकरण केले. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाझर तलाव दुरूस्ती,कोल्हापूर पद्धतीचे बंधारा दुरूस्ती कामाबाबतची माहिती देण्यात आली. जलशक्ती अभियान मोहिमेअंतर्गत शाळा व महाविद्यालयस्तरावर जनजागृती करण्यात आल्याची माहिती, जिल्ह्यातील पाणी स्त्रोत, साखर कारखाने, पिके यांचीही माहिती त्यांनी दिली.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतूनविविध करण्यात येणाऱ्या कामांची माहिती श्रीमती देशमुख यांनी दिली. सार्वजनिकबांधकाम विभागाच्या बांधण्यात येणाऱ्या इमारतीखाली पावसाचे पाणी साठवण करण्यात येतआहे. शाळांच्या इमारतीखालीही पाणी साठवण करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
अग्रवाल जिल्ह्याच्या कामानेभारावून गेले. पाऊस सुरू होण्यापूर्वी 2019 पासून जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पाण्याच्या स्त्रोताचे जीओ टॅगिंग करा, शाळा, नवीन बांधकाम करण्यात येणाऱ्या इमारतींना पावसाचे पाणी साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) सक्तीचे केल्याची माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय पथक (दि.17) सोलापूर शहरातील पासपोर्ट ऑफिस, उर्दू शाळा क्र.1याठिकाणी राबविण्यात आलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग, वन विभागाने राबविलेल्या मियावाकी वृक्षारोपन तसेच दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील विविध जलसंधारण कामांना भेटी देणार आहे. शनिवारी (दि. 18) मंगळवेढा तालुक्यातील येळगी वपौट व सांगोला तालुक्यातील विविध जलसंधारण कामांना भेटी देणार असल्याचे सांगण्यात आले. वृक्ष लागवडव भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने रिचार्ज स्ट्रक्चर,विहीर पुनर्भरण इत्यादी कामे हाती घेऊन जलशक्ती अभियान ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे कदम यांनी सांगितले.
0 Comments