प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
.png)
अकलूज (कटूसत्य वृत्त):- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालया तर्फे अकलूज शहरातील संगठित ध्यान व योगा प्राणायाम असे वेगवेगळ्या प्रकारचे योगासने घेण्यात आले.या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी भरपूर उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची विशेषता ही होती की आपण आपले मनाच्या शांतीसाठी मंदिराकडे धावतो तसे हे शरीर एक मंदिर आहे शरीराला स्वस्थ ठेवणे हे एक पूजाच आहे मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ रोज नियमितपणे व्यायाम करणे खूप गरजेचे आहे.
श्री पांडुरंग सूळ सर( जुनियर कॉलेज शिक्षक, योगा शिक्षक) यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम व योगासने घेतली त्यांनी सांगितले शरीर स्वस्थ पाहिजे सोबत आपले मन बुद्धी सुद्धा स्वस्त पाहिजे.त्याकरिता मेडिटेशन करणे गरजेचे आहे.ब्रह्मा कुमारीस सेंटर हे खूप योग्यच माध्यम आहे आपण आपले मन स्वस्थ ठेवू शकतो,शांतीचा अनुभव करू शकतो ब्रम्हाकुमारी येथे सात दिवसीय राज योग शिबिर या कोर्स द्वारा आपण ध्यान कसे करायचे आहे हे शिकवले जाते.परमपिता शिव परमात्मा विश्वाचा आता आपल्या सर्वांचा पिता आहे हे आपण जाणून घेणे गरजेचे आहे विनामूल्य हा कोर्स घेतला जातो. ब्रह्माकुमारी शिवरात्री बहनजी आणि सर्व बंधू भगिनींनी खूप उत्साहात व्यायाम केला आणि सोबत प्रतिज्ञा ही केली रोज न चुकता व्यायाम हा करणारच आपले मन बुद्धी शरीर ठेवण्यास प्राणायाम करणारच आहोत हा दृढ़संकल्प केला.
0 Comments