Hot Posts

6/recent/ticker-posts

65 लाखांच्या कामांचे 25 जून रोजी उद्घाटन

65 लाखांच्या कामांचे 25 जून रोजी उद्घाटन 

राउंड टेबल च्या तिन्ही शाखांचा सामाजिक उपक्रम

              सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- राऊंड टेबलच्या तिन्ही शाखांतर्फे मोहोळ, सावळेश्वर आणि सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे सर्वत्र मिळून 65 लाख रूपये खर्च करून  विविध प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पाचे उद्घाटन 25 जून रोजी होणार असल्याची माहिती सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबल  दीडशेचे अध्यक्ष रोहन शालगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

              सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबल 150, सोलापूर अचिव्हर्स राऊंड टेबल 187 व सोलापूर हाय फ्लायर्स  राऊंड टेबल 309 या तिन्ही शाखांच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील राऊंड टेबल समता हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात 32 लाख रुपये खर्च  करून पाच खोल्या बांधून देण्यात येणार असून या प्रकल्पामुळे अडीचशे मुलांना फायदा होणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन रंगनाथ बंग,फिलीप मौर्य  आणि कीर्ती रुईया यांच्या हस्ते होणार आहे.

              तर मोहोळ येथे राऊंड टेबल मूकबधिर निवासी शाळेचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून 13 लाख 50 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये दोन वर्गखोल्या तसेच इतर मुलांसाठी तयार केलेली  विशेष खोली  या प्रकल्पात असणार आहे. पन्नास मूकबधिर विद्यार्थ्यांना या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे.

              या प्रकल्पाचे उद्घाटन वरदराज बंग, फिलीप मौर्य आणि कीर्ती रूईया  यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागाचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण असा प्रकल्प पी.पी. पटेल फाउंडेशन आणि राउंड टेबल इंडिया यांच्यातर्फे हाती घेण्यात येणार असून त्यासाठी 18 लाख 40 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये अंतर्गत सुधारणा असे आणि 100 सेमी फाऊलर बेड्स त्याचबरोबर विविध वैद्यकीय उपकरणांची देणगी देण्यात येणार असून या प्रकल्पामुळे दरमहा चार हजार रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन 25 रोजी सायंकाळी पाच वाजता सिव्हिल  हॉस्पिटल येथे पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष विजयकुमार पटेल व डॉ.व्ही. एम. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे शालगर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस डॉ शशांक कार्वेकर,रोहित राठी, रोहित काला, निशी काला आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments