Hot Posts

6/recent/ticker-posts

चव्हाणवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी कैलास चव्हाण तर व्हा चेअरमनपदी अंकुश सलगर

 चव्हाणवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी कैलास चव्हाण तर व्हा चेअरमनपदी अंकुश सलगर

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी पासून जवळच असलेल्या  चव्हाणवाडी (टें) तालुका माढा येथील चव्हाणवाडी विकास सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली.या सोसायटीमध्ये भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलला २ जागा व दादा मामा विकास पॅनलला ११ जागा मिळाल्या. दादा मामा विकास पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाल्याने माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे व संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कै. रघुनाथ आबा चव्हाण यांचे चिरंजीव कैलास रघुनाथ चव्‍हाण यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड करण्यात आली तर  व्हा चेअरमनपदी अंकुश बाबू सलगर यांची एकमताने निवड करण्यात आली. माढा तालुक्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेली सोसायटी म्हणजे चव्हाणवाडी विकास सेवा सहकारी सोसायटी .मागील 35 वर्ष चव्हाणवाडी सोसायटीवर सत्ता गाजविणारे कै.रघुनाथ आबा चव्हाण यांनी केलेल्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन सभासदाची सेवा निसंकोचीत भावनेने केली. आशा आबाच्या कार्याची पोच पावती शेतकऱ्यांनी या पार्टीवर विश्वास दाखवून दिली. रघुनाथ आबा चव्हाण यांचे चिरंजीव कैलास रघुनाथ चव्‍हाण यांची चेअरमनपदी एकमताने निवड करण्यात आली. मिस्किन पार्टीचे अंकुश बाबू सलगर यांची व्हा.चेअरमन पदी निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुहास शिंगाडे व सचिव दादासाहेब नांगरे यांनी काम पाहिले. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. या निवडीवेळी सोसायटीचे सर्व आजी-माजी विद्यमान संचालक,सोसायटीचे सभासद, ग्रामपंचायतीचे आजीमाजी सदस्य व चव्हाणवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments