Hot Posts

6/recent/ticker-posts

21 जूनला आठवा आंतरराष्ट्रीय योगदिन हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजन

 21 जूनला आठवा आंतरराष्ट्रीय योगदिन हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजन


जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे सहभागी होण्याचे आवाहन

 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मानवतेसाठी योग या विषयावरील योग शिबिराचेआंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सकाळी सात ते आठ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

      जागतिक योगदिनाचे हे आठवे वर्ष साजरे करण्यात येत आहे. योगाचा प्रसार व्‍हावा म्‍हणून दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्‍युरोक्षेत्रीय कार्यालय सोलापूर, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, योग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्‍या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योग उपक्रमाची सुरूवात शंखध्‍वनीने होणार आहे. यानंतर भारतीय योग संस्‍थेच्‍यावतीने शिथिलकरण व्‍यायाम होतील. योग सेवा मंडळयोग साधना सेवासदन आणि विवेकानंद केंद्र यांच्‍यावतीने आसने होतील. पंतजली योगपीठ यांचे कडून बैठे आसने होतील. आर्ट ऑफ लिव्हिंच्‍या वतीने ध्‍यानधारणा होणार आहे. सदरील शिबिरामध्ये सोलापूर शहरातील क्रीडा व योग प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

     सदरील योगाच्या उपक्रमामध्‍ये जिल्‍हाधिकारी कार्यालयपोलिस आयुक्‍तालयजिल्‍हा परिषदसोलापूर महानगरपालिकापोलिस अधिक्षक कार्यालयपुण्‍यशोल्‍क अहिल्‍याबाई होळकर सोलापूर विदयापीठएन.एच.आय.एस.आर.पी.एफपोलिस प्रशिक्षण केंद्रएन.सी.सी. बटालियन 9 व 38जिल्‍हा माहिती कार्यालयराष्‍ट्रीय सेवा योजना, सह संचालक उच्‍च शिक्षण कार्यालयभारत स्‍काउट गाईड, पतंजली योगपीठयोग असोसिएशनदि आर्ट ऑफ लिव्हिंगविवेकानंद केंद्रभारतीय योग संस्‍थायोग सेवा मंडळयोग साधना मंडळगीता परिवार सर्व कल्‍याण योगरुद्र अकादमाी ऑफ मार्शल आर्ट अॅंड योग, योग परिषद आणि योग साधना सेवासदन, या शहरातील सर्व संस्थांचे सदस्‍य मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शहर मुख्यालयामध्ये राहणारे शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. सदरील योग शिबिर सोलापूर शहरातील सर्वांसाठी खुले असून नागरिकांनी 21 जून 2022 रोजी सकाळी 06.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी केले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments