Hot Posts

6/recent/ticker-posts

लाचखोरीच्या दोन कारवाई ; कृषी विस्तार अधिकारी आणि तलाठ्यास अटक

लाचखोरीच्या दोन कारवाई; कृषी विस्तार अधिकारी आणि तलाठ्यास अटक

           सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एक हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता ५०० रुपये स्वीकारले असताना कृषी विस्तार अधिकारी संदिप रामदास गावडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच  घेताना रंगेहात पकडले.

           यातील तक्रारदार यांनी त्यांचे वडीलांचे नावे जिल्हा परीषद सेस अंतर्गत डी बी टी योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशिन अनुदान मिळणेकरीता कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग येथे अर्ज सादर केला असुन सदर अर्जाचा पाठपुरावा यातील तक्रारदार करीत असताना आलोसे संदिप रामदास गावडे, कृषी विस्तार अधिकारी, कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग यांनी सदर अर्जामधील बँक अकाउंट नंबर चुकला असल्याचे सांगुन सदर अकाउंट नंबर दुरुस्त करण्याकरीता १ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती ५०० रुपये स्विकारण्याचे मान्य करुन सदर लाच रक्कम कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग, कार्यालयात स्वतः स्विकारलेवरुन त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

माढ्यातील तलाठ्यास अटक 

           शेतातील महोगणी झाडांची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी चार हजाराची लाच घेताना मोडनिंबच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

           महेशकुमार मनोहर राऊत (तलाठी, रा- मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर, रा. मेडशिंगी, ता. सांगोला) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांची मौजे मोडनिंब येथे क्र. ५२२ वर ५८ आर बागायत शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीपैकी ४० आर शेतजमीनीवर महोगनी झाडाची लागवड केली असून, त्याबाबत सात बारा उताऱ्यावर पिकपाण्याची लावण्यासाठी चार हजाराची लाच घेताना मोडनिंबच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

           गावकामगार तलाठी महेशकुमार राऊत यांनी तक्रारदारांच्याकडे ४०००/ रुपये लाचेची मागणी करून तो स्वतः स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आरोपी याला चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments