Hot Posts

6/recent/ticker-posts

शिराळ(टे) सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र लोकरे व्हाईस चेअरमन वसुदेव जगताप

शिराळ(टे) सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र लोकरे व्हाईस चेअरमन वसुदेव जगताप

                बेंबळे (कटुसत्य वृत्त): माढा तालुक्यातील शिराळ (टे) विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या सर्व संचालकांची निवड एकमताने करण्यात आली. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमनपदी राजेंद्र सिताराम लोकरे तर व्हा चेअरमन पदी वसुदेव हनुमंत जगताप यांची एकमताने निवड करण्यात आली. विशेष असे की या संस्थेची स्थापना 1955 साली झालेली असून स्थापनेपासून ते आजतागायत संचालक मंडळ व पदाधिकार्‍यांच्या निवडी एकमताने बिनविरोध झालेले आहेत व हीच परंपरा आजही कायम ठेवण्यात आलेली आहे. या निवडी प्रसंगी संचालक मोतीलाल लोकरे, अरुण लोकरे, मोहन यादव, कृष्णा लोकरे, सोपान लोकरे, छाया झिंगे ,सुनंदा झिंगे, रामचंद्र बनसोडे, प्रकाश भानवसे, दिगंबर सोलनकर यांच्यासहित ग्रामस्थ व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 1955 पासून या संस्थेच्या चेअरमनपदाची धुरा सिताराम लोकरे हेच पाहत होते परंतु वयोमानानुसार आता त्यांनी संस्थेची सूत्रे त्यांचे सुपुत्र राजेंद्र लोकरे यांच्याकडे सोपवली आहेत. राजेंद्र लोकरे हे शिराळ टे. येथील ब्रह्माकुमारी उपसेवा केंद्राचे संस्थापक व यातील आध्यात्मिक ज्ञानाचे गाढे अभ्यासक स्वर्गीय विलास अण्णा लोकरे यांचे बंधू आहेत. पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवकुमार मुंडासे यांनी काम पाहिले त्यांना संस्थेचे सचिव साहेबराव पोटरे यांनी सहकार्य केले. या निवडीबद्दल आमदार बबन दादा शिंदे ,आमदार संजय मामा शिंदे, दूध संघाचे चेअरमन रंजीत भैया शिंदे, तालुक्याचे सभापती विक्रम दादा शिंदे, पंचायत समितीचे सदस्य धनराज दादा शिंदे आदी मान्यवरांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे व त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिले आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments