घोडेबाजारीला खतपाणी घालण्याची परंपरा भाजपची;मात्र महाविकास आघाडीचा विजय निश्चित - महेश तपासे
.jpg)
मुंबई (नासिकेत पानसरे):- घोडेबाजारीला खतपाणी घालण्याची परंपरा भाजपची असून राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून राज्यसभेसाठी मुद्दामहून सातवा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे. घोडेबाजार करुन आमदार फुटतील असा प्रयत्न भाजपचा आहे असेही महेश तपासे म्हणाले.
महाविकास आघाडीला समर्थन देणारे घटक पक्ष आणि अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. जेव्हा राज्यसभेचे मतदान होईल त्यावेळी महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असेल आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आलेले असतील असा विश्वासही महेश तपासे यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment