Hot Posts

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष टिकणार - पटोले

  महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष टिकणार - पटोले

मुंबई (नासिकेत पानसरे):-  राज्यातील मविआ सरकार ५ वर्ष चिकेल यात कोणतीही शंका नाही. सरकार अल्पमतात आलं असं म्हणतात सरकार स्थापन करायचं तर राज्यपाल कोणाचं ऐकतात हे सर्वांना माहित आहे. मात्र ही परिस्थिती भाजपाने निर्माण केली आहे. सुरत मधून राजकीय भूकंप त्यांनी आसामला गोहाटी मध्ये नेहला असा आरोप कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमाशी बोलताना केला. मात्र आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत असंही त्यांनी सांगितलं

कॉग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठक बोलविण्यात आली होती त्या बैठकी नंतर पटोले यांनी सदर आरोप केला. शिवसेना महाविकास आघाडी मधून बाहेर पडावी असे जर बंडखोरांना वाटत असेल तर बाहेर पडायला तयार आहोत तुम्ही २४ तासात मुंबईत या समोरासमोर बसून बोलू असे आवाहन केल्यानंतर कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस दोन्ही घटक पक्षांची वेगवेगळी बैठक झाली. त्याकरीता बैठक झाली नाही तर तर महाविकास आघाडी सरकारचे नेते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत तो पर्यंत आमचे त्यांना समर्थन आहे. संजय राऊत जे काही बोलले हा त्यांचा अंतर्गत मामला असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व घडामोडीत भाजपा कुठेही नाही ते आता का समोर येत नाहीत.त्यांनी गुजरात मधील सुरत मध्ये नेहला त्यानंतर आसाम मधील गोहाटी मध्ये नेहला मात्र त्यांच्याकडेही बहुमत नाही. असेही पटोले म्हमाले.

Reactions

Post a Comment

0 Comments