पुण्यात घराचे ग्रील तोडून 15 लाखांचा ऐवज चोरीला

याप्रकरणी प्रवीण कांडपिळे (वय 48, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
प्रवीण हे व्यावसायिक असून ते सवेरा अपार्टमेंटमध्ये राहतात. घरात कोणीही नसल्याचं अफायदा घेत चोरट्यांनी सोमवारी दुपारी त्यांच्या फ्लॅटमध्ये गॅलरीतून प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी बेडरूममधून 45 तोळे 9 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 15 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. रात्री सातच्या सुमारास घरी आल्यानंतर प्रवीण यांना चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी सुरू केली आहे.
0 Comments