Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरच्या २१ ST कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

 सोलापूरच्या  २१ ST कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक येथील हल्ल्यात सोलापूर विभागाचे एकूण २१ कर्मचारी सहभागी होते. दरम्यान न्यायालयाने ता.२२ एप्रिल पर्यंत कामावर हजर होण्याची दिलेली मुदत संपून गेल्याने या कर्मचाऱ्यांचा वेळेत जामीन न झाल्याने त्यांना कामावर हजर होता आले नाही. उर्वरित सर्व कर्मचारी वेळेत हजर झाले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नोकरीपासून दूरच राहावे लागणार की काय असा प्रश्न उपस्‍थित होत आहे.एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी पाच महिने संपाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. पोलिसांनी या सर्व कर्मचाऱ्यांना अटक केली होती. दरम्यान संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी ता.२२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. या मुदतीनंतर आलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर न घेता त्यांची सेवासमाप्ती करणार की कामावर रुजू करुन घेणार हे आता पाहणे गरजेचे आहे. जिल्ह्यात नऊ आगार आहेत. यामध्ये ३४०५ कर्मचारी आहेत. ता. २२ एप्रिलच्या मुदतीपर्यंत जिल्ह्यातील सर्व कर्मचारी हजर झाले. मात्र या कर्मचाऱ्यांना जामीन लवकर मिळाला नाही, त्यामुळे यांना कामावर येण्यास उशीर झाला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नोकरीपासून दूर राहावे लागते की, काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments