पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील खाटाची संख्या दुप्पट करण्यास मंजूरी

मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील खाटाची संख्या दुप्पट करण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशात आ. समाधान आवताडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला महाविकास आघाडी सरकारने हिरवा कंदील दिला असून, यासाठी 13 कोटी 69 लाखाच्या निधीस नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली.नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेधनात 22 मार्च रोजी आ. समाधान आवताडे यांनी कोरोना संकटात गोर-गरीब रुग्णाचे उपचारावरून झालेले हाल पाहता आ. समाधान आवताडे यांनी तालुक्यातील आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत त्यांचा पाठपुरावा सुरूच ठेवला. पहिल्यापेक्षा दुसर्या लाटेचा तडाखा पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांना बसला. याच दरम्यान मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीनंतर अनेक राजकीय नेते गायब झाले. व रुग्णांना बेड मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. खाजगी रुग्णालयात अनेकांची लूट झाली. त्यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य व्यवस्थाच चव्हाट्यावर आली.विधिमंडळ कामकाज आ. समाधान आवताडे यांना फारसा अनुभव नसताना देखील दुसर्या अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी आ. समाधान आवताडे यांनी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांच्या संपर्क कार्यालयात आरोग्य खात्याच्या अधिकार्यांची बैठक घेऊन 9 उपकेंद्र उपकेंद्रे व अस्तित्वात असलेल्या आरोग्य केंद्र उपकेंद्राच्या माध्यमातून तालुक्याच्या ग्रामीण भागातील भागात आरोग्य सेवा देण्याबाबतच्या सूचना दिल्या. व ग्रामीण भागातील ओपीडी सुरू करून आरोग्य कर्मचार्यांना मुख्यालयात राहण्याच्या सूचना ही दिल्या. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय व मंगळवेढ्यातील ग्रामीण रुग्णालयातील सध्या असलेल्या खाटांची संख्या दुप्पट करण्याच्या दृष्टीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुंबई येथे भेट घेऊन, त्याबाबत निवेदन दिले. व जिल्हाधिकाय्राबरोबर झालेल्या नियोजन मंडळाच्या बैठकीत देखील आरोग्य व्यवस्थेवर जोर दिला.नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी हेच प्रश्न लावून धरताना व निंबोणी येथील प्रलंबित ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न देखील मार्गी लावण्याची मागणी केली. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील प्रयत्न केले होते. एकूणात आ. आवताडे च्या रडारवर आरोग्यव्यवस्था असल्याचे स्पष्ट झाले होते. सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये राज्यस्तर यांनी 17 मे रोजी पंढरपूर येथील प्रस्ताव सादर केला. त्यास 24 मे रोजी 13 कोटी 69 लाख 85 हजार 920 रुपयाच्या ढोबळ अंदाजपत्रकात मंजुरी देण्यात आल्याचे शासन निर्णय अव्वर सचिव दी. नी. केंद्रे यांच्या सहीने पारित झाल्याने आ. आवताडे यांचा पाठपुरावा सार्थकी लागला.कोरोना काळात रुग्णाचे झालेले हाल पाहता मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी मी प्रयत्न केलेल्या पहिल्या प्रयत्नास यश आले. आता मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाची वाढीव क्षमता व प्रास्तावित निंबोणी ग्रामीण रुग्णालयासाठी आता प्रयत्न करणार आहे त्याबाबत 1 जूनला विधिमंडळात बैठक होणार आहे.
0 Comments