कै. कर्ण अप्पा देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर
शिवसेनेचे टेंभुर्णी शहर माजी प्रमुख कै. कर्ण अप्पा देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त ९६ रक्तदात्यांनी रक्तदान केले
टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त):- ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन शिवसेनेचे माजी शहर प्रमुख कै.कर्ण अप्पा देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिबिराचे आयोजन केले.कै.कर्ण अप्पा देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त ९६ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली समाजाप्रती जबाबदारी दाखवली किशोर कर्ण देशमुख युवा सेना शहर समन्वयक टेंभुर्णी व मीरा फाउंडेशन च्या वतीने रक्तदान आयोजित करण्यात आले.
यावेळी उपस्थित युवासेना माढा लोकसभा विस्तारक उत्तमजी आयवळे साहेब, शिवसेना माढा तालुका प्रमुख मधुकर देशमुख, भाजपचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, युवासेना जिल्हा प्रमुख मा. सचिन बागल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे टेंभुर्णी शहराध्यक्ष व मीरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मयुर काळे, युवासेना माढा तालुका प्रमुख आनंद घोडगे, युवासेना माळशिरस तालुका प्रमुख गणेश इंगळे, भाजपचे इंदापूर तालुका संघटक विजय देवकर, युवा सेना इंदापूर तालुका प्रमुख सचिन इंगळे, युवासेना करमाळा शहर प्रमुख विशालजी गायकवाड, समाधान देशमुख, अक्षय ढवळे, आण्णा ढवळे, ॲड रणजित बाबर, प्रशांत पाटील, हरिष देशमुख, युवराज गोरे, प्रविण झिंगे, अमर लोकरे, धवल जगताप, विशाल जगताप, आकाश देशमुख, सुरज मस्के, सागर शिंदे, सागर रंदवे, राहुल सरडे, अमोल मस्के, किशोर नाळे, जिवन राऊत, सागर रोमन, दिपक देशमुख, सुरज जाधव, रविंद्र बेद्रे, दत्तात्रय कांबळे, सचिन अवचर व शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments