Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतातून दोन लाख किंमतीचा ट्रॅक्टर चोरी

शेतातून दोन लाख  किंमतीचा ट्रॅक्टर चोरी

             माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्याच्या उपळाई(खुर्द) गावातील कृषीभूषण स्व. गणेश  कुलकर्णी   यांचे शेतातून दोन लाख किंमतीचा ट्रॅक्टर चोरुन घेऊन गेल्याची घटना  ०२ मे रोजी  च्या सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे.

             सतीश बाबासाहेब पाटील यांनी माढा पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.दोन लाख  रुपये  किमतीचा एक महिंद्रा कंपनीचा अर्जून ६०५ मॉडेलचा लाल रंगाचा ट्रॅक्टर  (एम.एच. ४५ .ए. ५७५२) हा शेतात येऊन चोरुन नेला आहे.घटनेचा कसुन तपास करून 

             टॅक्टर शोधुन देण्याची मागणी शेतकरी सतीश पाटील यांनी माढा पोलिसांकडे केली आहे.पोलिस हेड कॉन्स्टेबल  प्रकाश  मांजरे   अधिक तपास करीत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments