सदाभाऊ खोत थट्टा करुन सामान्य जनतेच्या दु:खावर मीठ चोळत आहेत - क्लाईड क्रास्टो

देशात महागाई वाढत असताना सदाभाऊ खोत यांना मस्करी सुचत आहे...
मुंबई (नासिकेत पानसरे):- देशात महागाई कुठाय ? असा सवाल करुन दारू महाग असूनही लोकं पीत आहेतच ना अशी थट्टा करुन सदाभाऊ खोत हे सामान्य जनतेच्या दु:खावर मीठ चोळत आहेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे.
कुठाय महागाई? देशी दारुची क्वार्टर १५०-२०० रुपये झाली तरी पितायत असे वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
त्यावर क्लाईड क्रास्टो यांनी देशात महागाई वाढत असताना सदाभाऊ खोत यांना मस्करी सुचत आहे अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे.
शेतकर्यांच्या नावाने आपली पोळी भाजणारे खोत यांना कदाचित कल्पना नसावी की महागाईचा फटका सामान्य माणूस आणि शेतकरी दोघांनाही बसतो मात्र भाजपचं इमान राखण्यासाठीच व खुश करण्यासाठी ते बोलत आहेत असा खोचक टोलाही क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे.
0 Comments