“विनोद म्हणजे तणावावरील रामबाण औषध आहे” - रवि वसंत सोनार

जागतिक हास्य दिनी हास्यसम्राट स्पर्धा संपन्न...!
उद्धवबापू बागल प्रथम, धनाजीबापू देशमुख द्वितीय तर प्रशांतदादा फराटे तृतीय क्रमांकावर...!
पंढरपूर : “मिश्किल विनोद म्हणजे मानवाच्या जीवनातील तणावावरील रामबाण औषध आहे.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, साहित्य, संगीत, अध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय हास्य दिनाच्या औचित्याने ' सुप्रभात हास्यसम्राट - २०२२' या स्पर्धेवेळी बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की - “ सध्याच्या जीवन शैलीमध्ये प्रत्येक व्यक्ती अनेक वेळा तानतनावात असतात. परंतु अवती भोवती घडलेला, ऐकलेला किंवा पाहिलेला एखादा लहानसा विनोदी किस्सा त्या ताणतनावावर औषध रूपात काम करतो व मनावरचा ताण कमी होतो.”
सुप्रभात मित्र परिवार, पंढरपूर आणि कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय हास्य दिनाच्या औचित्याने येथील सुप्रभात मित्र मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्यांसाठी मिश्किल विनोदांची 'सुप्रभात हास्यसम्राट - २०२२' ही निमंत्रितांसाठीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
'सुप्रभात हास्यसम्राट - २०२२' या स्पर्धेमध्ये सुप्रभात मित्र परिवाराचे अनेक सदस्य विशेष उत्साहाने सहभागी झाले होते. सुप्रभात मित्र परिवाराचे ज्येष्ठ सदस्य मा. प्रा. डॉ. सुधाकर पडवळ यांनी या स्पर्धेचे तज्ञ परिक्षक म्हणून काम पाहिले. जवळपास तीन तास हास्यविनोदांचे फवारे उडवणाऱ्या या अतिशय चुरशीच्या आणि अटीतटीच्या स्पर्धेमध्ये मा. उद्धवबापू बागल हे 'सुप्रभात हास्यसम्राट - २०२२' चे मानकरी ठरले. मा. धनाजीबापू देशमुख यांनी द्वितीय तर प्रशांतदादा फराटे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
'सुप्रभात हास्यसम्राट - २०२२' या स्पर्धेतील तिन्ही विजेत्यांना सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. कल्याणराव काळे, ज्येष्ठ नेते मा. दिनकरबापू पाटील, मा. राजाभाऊ शिंदे आणि मा. देवानंद गुंड-पाटील या मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान बिल्ला, महावस्त्र, मानाची मखमली टोपी, पुष्पहार, सन्मानचिन्ह, चांदीची लक्ष्मी गणेश प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सचिव सोमनाथ देशमुख, कवी राजेंद्र झुंबर भोसले, विवेक कवडे, नितीन कांबळे, अगस्ती देठे, सुखदेव साळुंखे, अविनाश चव्हाण, अॅड. सोमनाथ मुचलंबे, उन्मेश चोरगे, कुलकर्णी, मोरे, गायकवाड सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि सोनार यांच्या या उपक्रमाचे हास्य प्रेमी तसेच समाजातील इतर अनेक मान्यवरांकडून कौतुक होत आहे. शिवाय ही स्पर्धा प्रत्येक वर्षी हास्य दिनाच्या औचित्याने राबविण्यात यावी अशी अपेक्षा सुप्रभात मित्र परिवाराच्या अनेक सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुप्रभात मित्र परिवार आणि कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.
0 Comments