जत-ठाणे एसटीचे चोपडी गावात स्वागत
नाझरा (कटुसत्य वृत्त):- आटपाडी,सांगोला, जत या भागातील मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी यासाठी ठाणे डेपोच्या वतीने ठाणे-जत गाडी नुकतीच सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी जत डेपोची वाळेखिंडी-मुंबई गाडी सुरू होती मात्र गेल्या दोन वर्षापासून ही गाडी बंद असल्यामुळे या भागातील प्रवाशांना खाजगी वाहनातून पुणे-मुंबई याठिकाणी जावे लागत होते.प्रवाशांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन ठाणे डेपो च्या वतीने ठाणे जत ही गाडी नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.सांगोला तालुक्यातील कोळे, चोपडी या परिसरातून ही गाडी आटपाडी मार्गे पुण्याला जात आहे. आज चोपडी येथे या गाडीतील वाहक व चालक यांचा सत्कार सेवानिवृत्त डाक कर्मचारी श्रीमंत तोरणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय.एस.बाबर, विमा प्रतिनिधी शेखर बाबर, नामदेव डोंगरे व इतर ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. वाहक व चालक यांना पेढा भरवून प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.चोपडी गावातील अनेकांनी ही गाडी सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
0 Comments