Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी सैनिक, सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्ह्यात ‘अमृत जवान अभियान’

माजी सैनिक, सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्ह्यात ‘अमृत जवान अभियान’

सोमवारी तालुकास्तरावर प्रलंबित कामांचा होणार निपटारा

             सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- शासनाच्या विविध कार्यालयात माजी सैनिक, शहीद जवान, कर्तव्यावर असणाऱ्या सैनिकांच्या व कुटुंबीयांचे अनेक शासकीय कामे शासन दरबारी असतात. या प्रलंबित कामाचा, तक्रारीचा सोमवारी (दि.23) सर्व तालुकास्तरावर तहसील कार्यालयात तत्काळ निपटारा करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

             जिल्ह्यात 01 मे ते 15 जून 2022 या कालावधीत ‘अमृत जवान अभियान’ राबविण्यात येणार आहे. या कालावधीत  तालुका पातळीवर अमृत जवान सन्मान अभियान समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. आजी, माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांचे विविध प्रश्न व समस्याचा निपटारा केला जाणार आहे. तालुकास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाच्या धर्तीवर अमृत जवान सन्मान दिन आयोजित करण्यात येणार आहे.

             तालुक्‍यातील विविध विभागाकडील माजी सैनिक, शहीद जवान, कार्यरत सैनिकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे विविध शासकीय प्रलंबित तक्रारींचा तत्काळ निपटारा तालुका स्तरीय समिती करणार आहे. आपल्या तक्रारी समिती समोर मांडव्यात, असे आवाहन  श्रीमती पवार यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments