Hot Posts

6/recent/ticker-posts

ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल येथे महाराष्ट्र दिन साजरा

ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल येथे महाराष्ट्र दिन साजरा

          टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त): ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टेंभुर्णी येथे एक मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष नवनाथ नाना शिंदे व त्यांच्या पत्नी भाग्यश्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

          यावेळी नवनाथ शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एक मे महाराष्ट्र दिन रोजी विद्यार्थ्यांचा निकाल होता.त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बहुसंख्य पालक उपस्थित होते.यावेळी संस्थेचे संस्थापक हरिचंद्र गाडेकर यांनी पुढील वर्षाची रणनीती पालकांना पटवून दिली.उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास ठरवून दिला. त्याप्रमाणे पालकांनी मुलांचा अभ्यास करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

          यावेळी संस्थापक हरिचंद्र गाडेकर परिवहन समितीचे अध्यक्ष समाधान मिस्कीन शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष नवनाथ शिंदे उपाध्यक्ष धनंजय भोसले शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुभाष इंदलकर- पाटील,सज्जन इंदलकर- पाटील, संदीप साळवे,चंद्रकांत खुळे,अनिल खुळे,गणेश खुळे,अनिल जाधव,बापू बंडगर,ठोंबरे, मिलिंद जगताप, कल्याण देशमुख इत्यादी पालक बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिव अर्चना गाडेकर, प्रिन्सिपल रेखा गाडेकर, मनीषा सोनवणे,ऋतुजा हामकर, मोहिनी काळे,सोमनाथ खरसाडे यांनी परिश्रम घेतले.

          कार्यक्रमाची प्रस्तावना हरिश्चंद्र गाडेकर यांनी मांडली.सूत्रसंचालन रेखा गाडेकर यांनी केले.आभार मनीषा सोनवणे यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments