बेंबळे सोसायटीच्या चेअरमन पदी सदाशिव भोसले तर व्हा चेअरमन पदी कांतीलाल काळे...
बेंबळे (कटुसत्य वृत्त): आर्थिक उलाढालीच्या बाबतीत माढा तालुक्यातील सर्वात मोठी सोसायटी म्हणून नावलौकिक असलेल्या बेंबळे सोसायटीवर आ बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक दोन विरोधी गटानी एकत्र येवून त्यांनी सोसायटीचे 13 पैकी तेरा संचालक विजयी केले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवार (दि.०९) रोजी सोसायटीच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला, यावेळी चेअरमन पदी विमलेश्वर आघाडीचे सदाशिव भोसले तर व्हा चेअरमन पदी सिध्देश्वर आघाडीचे कांतीलाल काळे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवकुमार मुंडासे यांनी काम पाहिले तर संस्थेचे सचिव महादेव घाडगे यांनी त्यांना सहकार्य केले.
यावेळी सोसायटीचे संचालक रामचंद्र अनपट, अनिल अवताडे, बाळू कोकाटे, ज्ञानेश्वर पवार, अरूण माने, सागर हुंबे, प्रतिभा भोसले, स्वाती भोसले, मोहन किर्ते, अब्दुल तांबोळी, संभाजी चोरमल यांच्यासह गोविंद भोसले, विष्णू हुंबे, दिलीप भोसले, संजय पवार, गोरख मिस्कीन, भिमराव पवार, यशवंत भोसले, संतोष शिंदे, बाळासाहेब काळे, समाधान सलगर, बापू भोसले, सोमाभाऊ शेळके यांच्यासह दोन्ही आघाड्यांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुलालाची उधळण करत पदाधिकाऱ्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
0 Comments