तृतीयपंथीयांच्या विकास योजनांसाठी समाज कल्याण विभागाचा पुढाकार

जिल्ह्यात 23 मे रोजी विशेष शिबिराचे आयोजन
पुणे (कटुसत्य वृत्त):- तृतीयपंथीय व्यक्तींना समाज कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांची पोर्टलवर नोंदणी करणे आणि त्यांना ओळखपत्र व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या निर्देशानुसार समाज कल्याण विभागातर्फे 23 मे रोजी हडपसर गाडीतळ पुणे येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयातर्फे तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी https//: https://transgender.dosje.gov.in हे स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. सदर पोर्टलवर तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने आणि त्यामुळे तृतीयपंथींयाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी निश्चित आकडेवारी मिळत नसल्याने राज्याच्या समाज कल्याण विभागाने नोंदणीसाठी पुढकार घेतला आहे.
तृतीयपंथी यांचे हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत त्यांच्या विकासासाठी, तसेच त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, उपाययोजनांची माहिती व्हावी व जनजागृती करणे इत्यादींसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत तसेच प्रशासनाच्यावतीने तृतीयपंथीयांसाठी सांस्कृतिक संम्मेलन, कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
समाज कल्याण आयुक्तालय पुणे येथे तृतीयपंथी समूहाचे सामाजिक सहभाग, स्वावलंबन, आरोग्य, स्वयंरोजगार नोंदणीबाबत नुकतेच संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणेरी प्राईंड संस्था, मैत्र क्लिनिक, गायत्री परिवाराचे प्रतिनिधी यांनी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थान, आयुष विभाग, आरोग्य मंत्रालय भारत सरकार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे, इस्कॉन शोध आरंभ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, पुणे वं श्री संत जगद्गुरू संत तुकाराम फाउंडेशन फॉर फिलांथ्रोपी या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये तृतीयपंथीयांची नोंदणी करण्यास प्राधान्य देऊन नोंदणीसाठी विशेष उपक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्तांनी शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे येथे आयोजित शिबिराचा अधिकाधिक तृतीयपंथीयांनी लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी ९८२२१९१५१० किंवा ९६६५५५७९३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.
0 Comments