Hot Posts

6/recent/ticker-posts

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अभिवादन

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अभिवादन

              पुणे, (कटुसत्य वृत्त): भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या  पुण्यतिथीनिमित्त मंचर येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

              यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, तहसीलदार रमा जोशी, सुभाषराव मोरमारे, सुहास बाणखेले, दत्ता थोरात मंगेश, बाणखेले युवराज बाणखेले आदी  उपस्थित होते.

              देशात संगणक क्रांती करण्याचे काम माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी केले, त्यामुळेच आज घरोघरी आधुनिक तंत्रज्ञान पाहावयास मिळत असल्याचे गृहमंत्री  वळसे-पाटील यावेळी म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments